भारत स्वतंत्र होऊन आपल्याकडे राजकीय लोकशाही आली परंतु सामाजिक लोकशाहीसाठी अजूनही संघर्ष

.

भारत स्वतंत्र होऊन आपल्याकडे राजकीय लोकशाही आली परंतु सामाजिक लोकशाहीसाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुतेची मूल्ये कागदोपत्री न राहता त्याचे प्रत्यक्षात आचरण होणे गरजेचे आहे. गरीब, वंचित, पीडित समाजाला आज एकविसाव्या शतकातही सामाजिक न्याय दुरापास्त ठरत आहे. ही सामाजिक विषमता नष्ट होणे ही काळाची गरज आहे. तसे झाले तरच आपला भारत देश खऱ्या अर्थाने बलशाली, सामर्थ्यशाली ठरेल, असे प्रतिपादन शिक्षक भावार्थ मांद्रेकर यांनी आगरवाडा पेडणे येथे केले.

विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती – गोवा व लईराई स्पॉट्स क्लब संयुक्त विद्यमाने आदर्शनगर आगरवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंती समारोहात प्रमुख वक्ते या नात्याने मांद्रेकर याप्रसंगी बोलत होते.

आंबेडजर जयंतीचे औचित्य साधून मांद्रे मतदार संघाचे नूतन आमदार जीन आरोलकर यांच्या हस्ते
वाड्यावरील विद्युत हायमास्टचे उदघाटन करण्यात आले.

त्यानंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी कालीदास तुयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वागत सादर करण्यात आले. यावेळी मांद्रेकर यांच्या सोबत व्यासपीठावर सन्मानीय पाहूणे म्हणून सतीश कोरगावकर, अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी गोवा (आठवले गट) ,दिवाकर जाधव ,अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनसेवा समिती- पेडणे, हेमंत चोपडेकर, वासंती परवार ,खजीनदार संविधानाची ज्योतो, समीर आगरवाडेकर ,सचिव – लईवाई स्पोटस् क्लब आगरवाडे व प्रितेश आगरवाडेकर हे मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे सतीश कोरगावकर यांनी आंबेडकरी चळवळीत युवा वर्गाने हिरिरीने भाग घेऊन बाबासाहेबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले.

प्रारंभी बाबलो आगरवाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दिवाकर जाधव , हेमंत चोपडेकर,
वासंती परवार, समीर आगरवाडेकर यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरुदास विरनोडकर यांनी केले. तर शेवटी श्रीमती अपर्णा आगरवाडेकर हिने
आभार मानले.

आगरवाडा पेडणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती समारोहात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भावार्थ मांद्रेकर, सोबत सतीश कोरगावकर, बाबलो आगरवाडेकर, दिवाकर जाधव व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar