.

 

आरोग्य सुविधांबाबत जनतेला शिक्षित करण्याची गरज – कार्लोस अल्वारीस फरेरा

पणजी:

लोकांना विविध सरकारी आरोग्य सुविधांबद्दल शिक्षित करणे आवश्यक आहे, कारण बरेच लोक अशा कार्यक्रमांबद्दल अनभिज्ञ आहेत असे हाळदोणाचे आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा म्हणाले.

गुरूवारी हाळदोणा येथील गवर येथील हाळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्राची (पीएमसी) तपासणी केल्यानंतर ते बोलत होते.

हाळदोणा पीएचसी प्रभारींसोबत बैठक घेतली आणि आरोग्य केंद्रातील सुविधांचा आढावा घेतला. काही गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. तसेच, अनेक सुविधा आणि कार्यक्रम आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. याची माहिती देण्याची गरज आहे आणि लोकांना या सुविधांबद्दल शिक्षित करायला हवं ज्या केंद्र आणि राज्य सरकार देत आहेत. कारण बहुतेक लोकांना त्याबद्दल माहिती नाही असे ते म्हणाले.

निरोगी जीवनशैली आणि नियतकालिक वैद्यकीय तपासण्यांचे पालन करण्याच्या गरजेवर भर देताना, फरेरा म्हणाले की असे काही लोक आहेत जे काही सुविधांबद्दल घाबरतात. उदाहरणार्थ, सरकार ऑनलाइन वैद्यकीय सल्ला देत आहे. या सुविधा पुरवण्यात सरकार चांगले काम करत आहे. आरोग्यसेवा ही एक महत्त्वाची बाब आहे. केवळ आजारी असतानाच डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा, नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, विशेषतः एकदा आपण वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर. आपल्याला चांगल्या सवयी आणि आहार पाळणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची काळजी घ्या,‌ते पुढे म्हणाले.

पोलीस चौकी व वीज उपकेंद्र कार्यालयातील सुविधांचाही आमदारांनी आढावा घेतला.

या दोन्ही ठिकाणच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. पोलिस 24×7 काम करत आहेत, त्यामुळे हे महत्त्वाचे आहे. तसेच, विद्युत विभागाच्या कार्यालयाला एक स्टोरेज रूमची आवश्यकता आहे. कार्यालयाची जागा लहान आहे, आणि योग्य शौचालयाची सोय नाही. या बाबतीत आपण प्रस्ताव मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar