आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतूनच सामाजिक भान ठेवून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन आयटी व पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवंटे

.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतूनच सामाजिक भान ठेवून कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन आयटी व पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवंटे यांनी पर्वरी येथे काढले.
जायटस् गृप ऑफ पर्वरी व जायटस् गृप ऑफ पर्वरी सहेली यांच्या अधिकारगहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले की ज्या समाजात आपण राहतो, त्याच्यासाठी सर्वानी एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवावेत.
यावेळी व्यासपीठावर फेडरेशन १० चे अध्यक्ष बसवराज पुजारी दिपक डिसोझा, नुतन अध्यक्ष अंकुश हळर्णकर, संदीप नाडकर्णी, शपथ ग्रहण अधिकारी विठ्ठल पासैकर, सहेली गृप पर्वरी चा अध्यक्षा सुमित्रा नाईक उपस्थित होत्या.
यावेळी नुतन अध्यक्ष अंकुश हळर्णकर व सहेली गृप पर्वरी चा सुमित्रा नाईक व इतर पदाधिकारी यांना शपथ ग्रहण अधिकारी विठ्ठल पासैकर यांनी शपथ दिली. यावेळी दोन नवीन सदस्य राजेन्द्र चोडणकर व एलॉस्तन फेर्नांडिस् यानाही शपथ दिली. डॉ. सुब्रमण्यम यांनी स्वागत केले. प्रदिप पेडणेकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सुत्रसंचालन नकूल म्हामल तर प्रज्ञा पेडणेकर यांनी आभार मानले.
फोटो भारत बेतकेकर
जायटस् गृप ऑफ पर्वरी चा अधिकारगहण प्रसंगी आयटी व पर्यावरण मंत्री रोहन खवंटे, बाजूला संदिप नाडकर्णी, बसवराज पुजारी व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar