जुनसवाडा मांद्रे येथील पठारावरील झाडांना वीज खात्याच्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे आग

.

जुनसवाडा मांद्रे येथील पठारावरील झाडांना वीज खात्याच्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे आग लागली आणि त्यात हजारो झाडे खाक झाली . पर्यावरणाच्या झालेल्या ह्या हानिबद्दल ‘स्वराज’ संस्थेने तीव्र संताप व्यक्त केला आहे . या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि संबधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे . ‘स्वराज’ संस्थेचे अध्यक्ष ॲड. किशोर शेटमांद्रेकर आणि सचिव तुषार गोवेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की गेली चार-पाच वर्षे काबाडकष्ट करून मांद्रे येथील ‘धवरुख ‘ या पर्यावरण प्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला होता आणि साडेचार हजार रोपट्यांची लागवड केली होती मात्र वीज खात्याच्या बेजबाबदार कंत्राटदाराने आग लावली आणि त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले . जूनसवाडा पठारवरील सगळी जागा सरकारच्या मालकीची असून या लाखो चौरस जमिनीवर गेल्या काही वर्षात अनेक भूखंड माफियांची नजर लागली आहे. वीज खात्याच्या संबंधित कंत्राटदाराने आपली जागा साफ करण्यासाठी पठारावर आग लावणे चुकीचे आहे. या गैर कृत्याची संबंधित सर्व सरकारी खाती आणि यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. गेली पाच वर्षे वाढणारी झाडे पर्यावरणासाठी फार मदत करत होती . ही झाडे खाक झाल्याने तिथे पुन्हा वृक्ष लागवड करणे आणि पठार पूर्ववत करणे याची जबाबदारी वीज खात्याची आहे. या प्रकरणी पुढील आठ दिवसात संबंधित योग्य ती कारवाही करावी अन्यथा वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असा इशारा ‘स्वराज ‘ संस्थेने दिला आहे .

‘स्वराज’ संस्था पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी कार्यरत आहे. गावात बगायदा डोंगर कापणी आणि समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बांधकामांना अजिबात थारा दिला जाणार नाही.
असे प्रकार रोखण्यासाठी ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यायलाच हवा . तसेच जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार या कार्यालयांनी यावर कारवाई करावी . अन्यथा ‘स्वराज’ संस्था संबंधित यंत्रणांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. गावाच्या रक्षणासाठी ‘स्वराज’ चे कार्यकर्ते कोणतीही लढाई लढण्यास तयार आहेत, असा इशाराही ॲड. किशोर शेटमांद्रेकर आणि सचिव तुषार गोवेकर यांनी दिला आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar