स्टीफनची हॅट्‌ट्रिक, रोझमन क्रुझची आगेकूच

.

 

 

स्टीफनची हॅट्‌ट्रिक, रोझमन क्रुझची आगेकूच
पणजी ः रोझमन क्रुझ नागवाने गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात कुंकळ्ळी युनियनचा ६-२ असा पराभव केला. गोवा युनायटेड स्पोर्टस् अकादमी यांनी आयोजित या स्पर्धेतील हा सामना नावेली येथील रोझरी मैदानावर खेळविण्यात आला.
रोझमन क्रुझने या सामन्यात १४व्या मिनिटाला स्टीफनकरवी खाते उघडले. ४१व्या मिनिटाला डेस्मन याने त्यांची आघाडी दुप्पट केली. कुंकळ्ळी युनियनला या सामन्यात चाली रचण्याच्या बाबतीत रोझमनच्या जवळपासही फिरकता आले नाही. दुसर्‍या सत्रात स्टीफनने आपली हॅट्‌ट्रिक पूर्ण केली तर जेसलॉय व सावियो यांनी प्रत्येकी एक गोल केला. कुंकळ्ळीने आपले दोन्ही गोल सामना संपण्याच्या सुमारास ट्रिजॉयकरवी लगावले.
साळगाव युनायटेडचा शूटआऊटवर विजय
कळंगुट येथील पोरियट मैदानावर साळगाव युनायटेडने अटीतटीच्या लढतीत सेंट मॅथ्यूज एससीचा टायब्रेकरवर ७-६ असा पराभव केला. पूर्ण वेळेत दोन्ही संघ २-२ असे बरोबरीच्या स्थितीत होते. सेंट मॅथ्यूजकडून ऑलविन कार्दोज व सोमनाथ पाटील यांनी तर साळगावकडून निखिल नाईक व पावलो जुआव यांनी लक्ष्य साधले. टायब्रेकरवर सेंट मॅथ्यूजकडून फिल्टन डिकुन्हा, ऑलविन कार्दोज, सेल्वेनो गोन्साल्विस व स्टीवन गोन्साल्विस यांनी तर विजयी संघाकडून निखिल नाईक, पावलो जुआव, सिद्धेश केसरकर, लतेश मांद्रेकर व शॅनेल फर्नांडिस यांनी गोल केले. साळगावचा गोलरक्षक आगुस्तिन डिमेलो याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar