सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ८० व्या जन्मोत्सव !*_

.

 

_*सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ८० व्या जन्मोत्सव !*_

*रामनाथी ते नागेशी परिसरात हजारो साधक, भाविक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘रथोत्सव’ भावपूर्णरित्या साजरा !*

रामनाथी (फोंडा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी ते नागेशी परिसरात भावपूर्ण आणि आनंददायी वातावरणात रथोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी 3 वाजता सनातन आश्रम, रामनाथी येथून या रथोत्सवाला प्रारंभ झाला. रामनाथी ते नागेशी ते पुन्हा रामनाथी असा २ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून तो परत आला. या रथोत्सवाच्या प्रारंभी धर्मध्वज, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवलेली चैतन्यमय पालखी, पालखीच्या दोन्ही बाजूंनी नऊवारी नेसलेल्या सुवासिनींचे कलश पथक, पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले साधकवृंद, ‘पारंपरिक नृत्य करणार्‍या संगीत-साधिकांचे पथक’, ‘टाळ पथक’, तसेच ‘भगवे ध्वज’ हातात घेतलेले साधक आणि साधिका सहभागी झाले होते. प्रत्यक्ष रथामध्ये दर्शनासाठी तमिळनाडू येथील स्वयंभु श्रीराम शाळीग्राम’ ठेवलेले होते. या रथात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीही वंदनीय उपस्थिती होती. या वेळी रथोत्सवाच्या स्वागतासाठी रामनाथी ते नागेशी मार्गावर स्थानिक लोकांनी रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा उभे हजारो साधक, भाविक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे ‘श्री देव रामनाथ की जय’, ‘श्री शांतादुर्गा देवी की जय’, ‘श्री देव नागेश महारुद्र की जय’, ‘श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’, असा देवतांच्या नावाने जयघोष केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मे महिन्यात सनातन संस्थेद्वारे २८० प्राचीन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. १०२० मंदिरांमध्ये पुजारी, मंदिर विश्‍वस्त आणि स्थानिक संत-महंत यांच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये हिंदु एकता दिंडींचे आयोजन करण्यात आले. संत, वारकरी, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, धर्मसंप्रदाय, आध्यात्मिक संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या. एकूणच या सर्व उपक्रमांत ५० हजारांहून अधिक हिंदूंनी सहभाग नोंदवला.

आपला नम्र,
*श्री. चेतन राजहंस,*
प्रवक्ता, सनातन संस्था,
(संपर्क क्र. : 77758 58387)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar