हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पंचक्रोशी हायर सेकंडरी व व्यावसायिक  विभागाचा बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.यंदा बारावीचा एकूण निकाल 94.66 

.
  1. हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पंचक्रोशी हायर सेकंडरी व व्यावसायिक  विभागाचा बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.यंदा बारावीचा एकूण निकाल 94.66
    टक्के लागला आहे त्याबद्दल प्राचार्य गोविंदराज देसाईव अध्यपक मंडळींचे कौतुक होत आहे.

    दरम्यान, गोव्यात शैक्षणिक विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या हरमल पंचक्रोशी शिक्षण संस्थेला ‘ब्रँड ऑफ गोवा’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार  राज्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याहस्ते संस्थेचे चेअरमन तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकताच स्वीकारला होता.

    ह्या संस्थेच्या हायर सेकंडरी विभागाच्या चारही विभागातून 281 विद्यार्थ्यापैकी 266 विध्यार्थी उत्तीर्ण झाले.यंदा विज्ञान शाखेत 100 पैकी 97 उत्तीर्ण होऊन निकाल 97 टक्के लागला कु रितिक्षा चिंचकर (82.67 टक्के) प्रथम आली.वाणिज्य शाखेत 62 पैकी 61 विद्यार्थी उत्तीर्ण निकाल 98 टक्के लागला, कु दीक्षा नानोस्कर (89.83 टक्के)प्रथम आली.कला शाखेत 69 पैकी 69 उत्तीर्ण निकाल 100 टक्के कु सेजल नाईक (96.70 टक्के)प्रथम आली व व्यावसायिक विभागात 50 पैकी 39 विध्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल 78 टक्के कु माविन सौझा ( 88 टक्के) प्रथम आली.एकूण निकालात विशेष प्राविण्य 65 विध्यार्थी,प्रथम वर्गात 141 व द्वितीय वर्गात 59 विध्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यालयाच्या ह्या यशात यंदा मुलींची बाजी दिसून आली.

    यंदाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रा लक्ष्मीकांत पार्सेकर, व्यवस्थापक तथा हायस्कुलच्या मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर, प्राचार्य प्रा गोविंदराज देसाईव अध्यपक वर्ग ,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आदींचे अभिनंदन केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar