- विधालयाना चांगल्या साधनसुविधा उपलब्ध करून देणे आज गरजेचे असून आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे विधाथाना येणे गरजेचे आहे. ती उपलब्ध करून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे. असे उदगार पेडणे चे आमदार प्रवीण आलैकर यांनी कासारवणै येथे काढले
ज्ञानदीप अकादमी हायस्कूल पूर्वा कासारवणै येथील बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की विधालयाचा शैक्षणिक दर्जा सुधारणांसाठी आपला नेहमी पाठिंबा असेल. विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून आपल्या आईवडिलांचे तसेच गावचे नाव उज्ज्वल करावे. कोणत्याही बाबतीत दुसऱ्याच अनुकरण न करता आपली स्वतः ची अशी वेगळी ओळख निर्माण करावी.
यावेळी खास निमंत्रित म्हणून तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे, भाजप मंडळ अध्यक्ष तुलसीदास गावस, अध्यक्ष भुषण शिरोडकर, उमेश गांवस, किर्ती गावस, अर्जुन शेटये, पंच रमेश पालयेकर, करीशमा वारंग, सदस्य शीतल नाईक, आरवी शिरोडकर, व्यवस्थापक उमेश गावस यांनी बोलताना सांगितले की शाळेची वाटचाल १२ वर्षे सुरू झाली मात्र अडचणीवर मात करत ही शाळा आम्ही सुरू ठेवली. आमदार आलैकर व तुळशीदास गावस यांनी विधालयाला नवीन वास्तू उभारण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
शैक्षणिक प्रगती साधून विधाथानी स्वत चे व विधालयाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन तुळशीदास गावस यांनी केले. २०१९-२० या वर्षी प्रथम आलेल्या श्रेया देसाई, शुतिका गावस, सेजल ठाकुर, दिनेश केरकर, आशिष आरोदेंकर याचा तसेच २०२१-२२ यावर्षी प्रथम आलेल्या अनुज कानुळकर, दिपराज नाईक, सिद्धी गाड, शिवानी हरीजन, देवेंद्र हळदणकर, व रजत लिंगुडकर यांचा गौरव करण्यात आला. सुत्रसंचालन आश्विनी गावडे हीने केले. वार्षिक अहवाल किर्ती गावस हीने सादर केला. ओळख अशलेषा परब हिने करून दिली प्रमाणपत्र वितरण व सुत्रसंचालन रविना परब, करीशमा राऊळ, नानू बानकर, शुभम खापणे यांनी केले तर अंजली नाईक हिने आभार