स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पेडणे तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धा

.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त पेडणे तालुका मर्यादित वक्तृत्व स्पर्धा शनिवार 28 मे रोजी संध्याकाळी 4 वाजता,खालचावाडा श्री नारायणदेव देवस्थानच्या सभामंडपात घेण्यात येईल, असे देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्राम तारी यांनी कळविले आहे.

ह्या तालुकास्तरावरील वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘मी सावरकर बोलतोय’ हा विषय असून पहिल्या गटासाठी 2 ते 3 मिनिटे तर दुसऱ्या गटांसाठी 3 ते 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल, असे आयोजकानी कळविले आहे.

सदर स्पर्धा दोन गटात असून, 15 वर्षाखालील गटांसाठी प्रथम रोख बक्षीस रु 3 हजार,2 हजार व 1 हजार तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे, प्रशस्तीपत्र तसेच स्पर्धकांनी जन्मदाखला प्रत सोबत घ्यावी व दुसऱ्या 15 वर्षावरील गटांसाठी प्रथम रु 5 हजार,3 हजार व रु 2 हजार व दोन उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क असून दोन्ही गटात प्रत्येकी 10 जणांना प्रथम संपर्क साधणाऱ्या व्यक्तीस प्रवेशसंधी देण्यात येईल.स्पर्धेत भाग घेणाऱ्या इस्चुकांनी अध्यक्ष विश्राम तारी 94207 25499 किंवा सचिव हनुमान गोकर्णकर 95183 25839 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक संस्थेने केले आहे.स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याचदिवशी संध्याकाळी 6 वाजता श्री देवस्थान प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar