महाराष्ट्र-गोवा क्लस्टरने भारतातील ला लिगा प्रेक्षकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च योगदान देऊन पुढे झेप घेतली भारतातील ला लिगा च्या अधिकृत प्रसारक, वायकॉम 18 कडील दर्शक डेटावरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र-गोवा क्लस्टर हे भारतातील ला लिगा च्या दर्शकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक योगदान देणारे मार्केट आहे, जे अंतिम सामन्यांच्या दिवसांमध्ये जवळजवळ 30% योगदान देते. स्पॅनिश लीग सामने आणि कॉन्टेंट दर्शकांसाठी वायकॉम 18 नेटवर्कवर, एमटीव्ही आणि स्पोर्ट्स 18 टीव्ही चॅनेल आणि वूट सिलेक्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात ला लिगा भारतात पाच वर्षे साजरी करत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. जोस अँटोनियो कॅचाझा, व्यवस्थापकीय संचालक, ला लिगा इंडिया आणि आकृती वोहरा, भारतीय प्रतिनिधी, ला लिगा ग्लोबल नेटवर्क या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. भारतातील ला लिगा च्या प्रेक्षकसंख्येतील उल्लेखनीय वाढीचे श्रेय शीर्ष युरोपियन लीगने देशातील नवीन आणि विद्यमान चाहतावर्गाशी जोडण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना दिले जाऊ शकते. या उपक्रमांमध्ये उत्पादन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेचा वापर, आघाडीच्या भारतीय आणि जागतिक कंपन्यांसह भागीदारीद्वारे सुलभता वाढवणे, विविध बाजारपेठांमध्ये चाहत्यांवर केंद्रित सहभागात्मक क्रियाकलाप आणि क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी तळागाळातील उपक्रमांचा पुढाकार यांचा समावेश आहे. जोस अँटोनियो कॅचाझा, व्यवस्थापकीय संचालक, ला लिगा इंडिया, म्हणाले, “गोव्याचा फुटबॉलशी असलेला संबंध मजबूत आणि जुना आहे, आणि राज्याने कोणत्या प्रकारची प्रतिभा आणि क्लब विकसित केले आहेत यावरून ते दिसून येते. सुंदर खेळ आणि ला लिगा यांच्याबद्दल त्यांच्यात असलेली आत्मीयता आम्हाला आमच्या उत्पादनाची ऑफर मजबूत करण्यासाठी आणि चाहत्यांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी सतत प्रेरित करत आहे. आम्ही चाहत्यांचा अनुभव अनेक पटींनी सुधारण्यासाठी आणि तळागाळात फुटबॉलची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध आहोत.” आशियातील लीगचे दुसरे कार्यालय असलेल्या ला लिगा चे नवी दिल्ली कार्यालय, 2017 मध्ये स्थापन करण्यात आले. त्यानंतरच्या पाच वर्षांत, ला लिगा ने चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढवली, 2000% ने सामाजिक प्रेक्षक वाढवले, तळागाळातील कार्यक्रमांची स्थापना केली आणि आणि बीकेटी, ड्रीम11 आणि हिरो वियर्ड सारख्या आघाडीच्या भारतीय कंपन्यांशी मजबूत संबंध निर्माण केले.. इतर महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार, रोहित शर्माला ला लिगा चा भारतातील पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त करणे, गिरोना एफसी ला भारतात सामने खेळण्यासाठी केरळला आणणे, अनेक नामांकित ला लिगा दिग्गजांसह मोठ्या चाहत्यांचे दर्शन आणि कार्यक्रम आयोजित करणे आणि बरेच काही यांचा समावेश आहे ला लिगा बद्दल ला लिगा ही एक जागतिक, नाविन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार , फुरसती आणि मनोरंजन क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. . ही एक खाजगी क्रीडा संघटना आहे जी ला लिगा सँटेंडर. मधील 20 आणि ला लिगा स्मार्ट बँक मधील 22 संघांची बनलेली आहे, जी या राष्ट्रीय व्यावसायिक फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनासाठी जबाबदार आहे. ला लिगा ही फुटबॉल स्पर्धा आहे ज्यात जगातील सोशल नेटवर्क्सवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत, ज्यांची संख्या 140 दशलक्षांपेक्षा जास्त असून 16 प्लॅटफॉर्मवर आणि 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे माद्रिद (स्पेन) येथे मुख्यालयासह, ते 11 कार्यालये आणि 44 प्रतिनिधींद्वारे 41 देशांमध्ये उपस्थित आहे. असोसिएशन तिच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करते आणि बौद्धिकदृष्ट्या आव्हान असलेल्या फुटबॉलपटूंसाठी लीग असलेली जगातील पहिली व्यावसायिक फुटबॉल लीग आहे: ला लिगा जेन्युइन

.
महाराष्ट्र-गोवा क्लस्टरने भारतातील ला लिगा       प्रेक्षकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च योगदान देऊन पुढे झेप घेतली भारतातील ला लिगा च्या अधिकृत प्रसारक, वायकॉम 18  कडील दर्शक डेटावरून असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र-गोवा क्लस्टर हे भारतातील ला लिगा च्या दर्शकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक योगदान देणारे मार्केट  आहे, जे अंतिम सामन्यांच्या दिवसांमध्ये जवळजवळ 30% योगदान देते. स्पॅनिश लीग सामने आणि कॉन्टेंट दर्शकांसाठी  वायकॉम 18  नेटवर्कवर, एमटीव्ही  आणि  स्पोर्ट्स  18 टीव्ही चॅनेल आणि वूट सिलेक्ट  प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. गोव्यातील एका कार्यक्रमात ला लिगा  भारतात पाच वर्षे साजरी करत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. जोस अँटोनियो कॅचाझा, व्यवस्थापकीय संचालक, ला लिगा  इंडिया  आणि आकृती वोहरा, भारतीय प्रतिनिधी, ला लिगा ग्लोबल नेटवर्क  या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
भारतातील ला लिगा च्या प्रेक्षकसंख्येतील उल्लेखनीय वाढीचे श्रेय शीर्ष युरोपियन लीगने देशातील नवीन आणि विद्यमान चाहतावर्गाशी जोडण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांना दिले जाऊ शकते. या उपक्रमांमध्ये उत्पादन सुधारण्यासाठी तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेचा वापर, आघाडीच्या भारतीय आणि जागतिक कंपन्यांसह भागीदारीद्वारे सुलभता वाढवणे, विविध बाजारपेठांमध्ये चाहत्यांवर केंद्रित सहभागात्मक क्रियाकलाप आणि क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी तळागाळातील उपक्रमांचा पुढाकार यांचा समावेश आहे.
जोस अँटोनियो कॅचाझा, व्यवस्थापकीय संचालक, ला लिगा इंडिया, म्हणाले, “गोव्याचा फुटबॉलशी असलेला संबंध मजबूत आणि जुना आहे, आणि राज्याने कोणत्या प्रकारची प्रतिभा आणि क्लब विकसित केले आहेत यावरून ते दिसून येते. सुंदर खेळ आणि ला लिगा  यांच्याबद्दल त्यांच्यात असलेली आत्मीयता आम्हाला आमच्या उत्पादनाची ऑफर मजबूत करण्यासाठी आणि चाहत्यांशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी सतत प्रेरित करत आहे. आम्ही चाहत्यांचा अनुभव अनेक पटींनी सुधारण्यासाठी आणि तळागाळात फुटबॉलची उभारणी करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
आशियातील लीगचे दुसरे कार्यालय असलेल्या ला लिगा चे नवी दिल्ली कार्यालय, 2017 मध्ये स्थापन करण्यात आले. त्यानंतरच्या पाच वर्षांत, ला लिगा ने चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढवली, 2000% ने सामाजिक प्रेक्षक वाढवले, तळागाळातील कार्यक्रमांची स्थापना केली आणि आणि  बीकेटी, ड्रीम11  आणि हिरो वियर्ड सारख्या आघाडीच्या भारतीय कंपन्यांशी मजबूत संबंध निर्माण केले.. इतर महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार, रोहित शर्माला ला लिगा चा भारतातील पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त  करणे, गिरोना एफसी  ला भारतात सामने खेळण्यासाठी केरळला आणणे, अनेक नामांकित ला लिगा दिग्गजांसह मोठ्या चाहत्यांचे दर्शन आणि कार्यक्रम आयोजित करणे  आणि बरेच काही यांचा समावेश आहे
ला लिगा बद्दल
ला लिगा ही एक जागतिक, नाविन्यपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार , फुरसती आणि मनोरंजन क्षेत्रातील अग्रणी संस्था आहे. . ही एक खाजगी क्रीडा संघटना आहे जी ला लिगा  सँटेंडर.  मधील 20 आणि ला लिगा  स्मार्ट बँक मधील 22 संघांची बनलेली आहे, जी या राष्ट्रीय व्यावसायिक फुटबॉल स्पर्धांच्या आयोजनासाठी जबाबदार आहे. ला लिगा ही फुटबॉल स्पर्धा आहे ज्यात जगातील सोशल नेटवर्क्सवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत, ज्यांची संख्या 140 दशलक्षांपेक्षा जास्त असून 16 प्लॅटफॉर्मवर आणि 15 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे  माद्रिद (स्पेन) येथे मुख्यालयासह, ते 11 कार्यालये आणि 44 प्रतिनिधींद्वारे 41 देशांमध्ये उपस्थित आहे. असोसिएशन तिच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करते आणि बौद्धिकदृष्ट्या आव्हान असलेल्या फुटबॉलपटूंसाठी लीग असलेली जगातील पहिली व्यावसायिक फुटबॉल लीग आहे: ला लिगा जेन्युइन

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar