ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवा आपल्या तीर्थाटन विभागातफै गोव्यातील तिर्थयात्रीना ओरिसा पूरी येथील श्री जगन्नाथ

.
विविध माध्यमातून लोकसेवेची परंपरा कायम ठेवीत ज्ञानदीप प्रतिष्ठान गोवा आपल्या तीर्थाटन विभागातफै गोव्यातील तिर्थयात्रीना ओरिसा पूरी येथील श्री जगन्नाथ देवाचे दर्शन घडवून आणण्यास सर्वोतोपरी मदत पूरवली
तीर्थाटन विभागाच्या प्रमुख राखी पालेकर यांच्या कुशल नियोजनामुळे यात्रेकरूंना एक सुखद अनुभव घेता आला. त्यांनी १७ मे रोजी २१ यात्रेकरूंना घेऊन भुवनेश्वर- पूरी गाठले. पाच दिवसाच्या या मुकामात पूरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर व इतर अनेक महत्त्वाच्या स्थळाना भेट देण्यात आली. यात श्री लिंगराज मंदिर, कोर्णाक येथील सूर्य मंदिर , मुक्तेश्वर व सिद्धेश्वर मंदिर, भुवनेश्वर येथील राज्य संग्रहालय, रघूराजपूर व पिपीली  ही ओरिसा राज्यातील
परंपरा व संस्कृती दर्शवणारी गाव, सखी गोपाल मंदिर, धवलगिरी येथील अशोक स्तंभ, श्री जगन्नाथ देवाचा रथयात्रा मार्ग, नौका विहार, तलाव इत्यादी ठिकाणाचा समावेश होता. संध्याकाळी पूरी येथील चौपाटीवर विविध प्रकारच्या शंख व शिंपल्याचा खरेदीसाठी उसळलेली गर्दी बघण्यासारखी असते. श्री जगन्नाथ मंदिरात खास पद्धतीने माती च्या भांडात शिजवलेला छप्पन भोग प्रसाद केळीच्या पानावर ग्रहण करणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. या यात्रेत १८ महिन्याचे बालक ते ५० वर्षावरील यात्रीनी ओरिसा दर्शनाचा पूरेपूर आनंद घेतला

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar