बालभवनचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास….. श्री दयानंद चावडीकर,संचालक बालभवन-गोवा

.
  • बालभवनचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास…..
    श्री दयानंद चावडीकर,संचालक बालभवन-गोवा

पणजी बालभवनचा गुणदर्शन कार्यक्रम रंगला…

पणजी (पत्रक): एप्रिल मे महिन्याच्या सुट्‌टीत मुलांना विविध कलांचा आनंद लुटता यावा या उद्देशाने पणजी बालभवनने आयोजित केलेल्या उन्हाळी शिबीराचे औचित्य साधून बरोबर संपुर्ण गोव्यातील बालभवन केंद्रामधून “गुणदर्शन-२०२२” कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बालभवन कांपाल येथे आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी आपले कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना बालभवनचे संचालक श्री दयानंद चावडीकर यांनी लहान मुले ही वैविध्यपुर्ण कलागुणांनी संपन्न असतात त्यांच्यातील उपजत कलागुणांना आकार देउन मुलांना सर्वोत्तम व्यासपिठ देण्याचे काम बालभवन कटाक्षाने करीत आहे. बालभवन ही मुलांमधील सृजनशिलतेला प्रोत्साहन देणारी एकमेव संस्था आहे. मुलांना चित्रकला, हस्तकला, मुर्तीकला, संगीत,नृत्य, कथाकथन,संगणक ,नाट्‌य , खेळ, योगा यासारख्या विषयांचे बालभवनमार्फत शिक्षण देउन मुलांचा सर्वांगीण विकास व व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी विविध कार्यशाळा,प्रशिक्षण कार्यक्रम, प्रकाशने, मुलांसाठी स्पर्धा, अशा वेगवेगळया माध्यमातून बालभवन संपुर्ण गोव्यात कार्यरत आहे. बालभवनचा विकास हेच माझे ध्येय्य असून गोवा बालभवनला जागतिक दर्जा मिळवा हाच माझा ध्यास असल्याचे प्रतिपादन केले. तसेच बालभवनसाठी नव्याने हाती घेतलेल्या उपक्रमांची त्यानी उपस्थितांना माहिती दिली. बालभवनमध्ये नव्या शैक्षणिक तंत्रज्ञानाचा सामावेश व्हावा याकरीता आय लाईफ वर्ड यांच्या सहकार्यातून कोडींग प्रोग्राम,आर्टिफिशीअल इंटलिजन्स, व्हर्चूअल रिॲलिटी, अशा प्रकारच्या आधूनिक तंत्रज्ञानाचे आवश्यक ज्ञान मुलांना देण्यासाठी बालभवनमध्ये सुरू होणा–या वर्गांचा लाभ ध्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना प्राईम टिव्हीचे व्यवस्थापकीय संचालक श्री संदिप केरकर यांनी बालभवनचे मुलांसाठी देत असलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्‌गार काढले.व प्राईम टिव्ही च्या माध्यमातून मुलांचे कार्यक्रम प्रासरीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आय लाईफ वर्डचे संस्थापक श्री सी आर. अमरनाथ यांनी बालभवनच्या 3 ते २१ वयोगटासाठी लवकरच सुरू होणा–या Future Edutainment Programme बद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.

यावेळी आय लाईफ वर्डच्या सहसंस्थापक श्रीमती रूही ठक्कर, ज्ञानविकास स्कुलचे प्रशासकिय संचालक श्री गौतम खरंगटे, चित्रपट उद्योग क्षेत्रातील नामवंत संगीतकार श्री जो डिसोजा,आंतरराष्ट्रीय किर्तीचे नृत्य संयोजक श्री सुदेश साळगांवकर, सौ.रम्या कार्यक्रम अधिकारी शशिकांत पुनाजी, सहा.लेखा अधिकारी श्री लक्ष्मीदास मणेरकर आदी मान्यवर मोठया संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी सादर करण्यात आलेल्या गुणदर्शन कार्यक्रमात विद्याथ्यानी विवीध कलाविष्कार सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरवात हस्तकला, चित्रकला, मातीकाम, विभागाच्या मुलांनी तयार केलेल्या कलाकृतीं च्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाने झाली. बालभवनच्या मुलांनी सादर केलेल्या मन की विणा से गुंजीत ध्वनी मंगलम या स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. नंतर बालभवन केंद्र खांडेपारच्या मुलांनी ईशस्तवन व बालभवन वर आधारीत गीत सादर केले. दरम्यान बालभवनने उन्हाळी शिबीरात आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्यांना पारीतोषिके देण्यात आली.नृत्य विभागाच्या मुलांनी भरतनाट्यम नृत्य गुर्रू ब्रम्हा गुर्रू विष्णू हे नृत्य सादर केले तर बालनृत्य किलबील किलबील पक्षी बोलती व असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ही बालनृत्ये सादर केली. गिटार वादनातून बालभवनच्या मुलांनी पाश्चात्य संगीताचे दर्शन घडवले तर हार्मोनिअम विभागाच्या मुलांनी राग किरवाणी सादर केला. गायन विभागाच्या मुलांनी समूहगीते सादर केलीतर नाट्यविभागाच्या मुलांनी रस्ता नाट्‌य व आमी सगळे एक हे नाटक सादर केले.तबलाविभागाच्या मुलांनी सुर ताल लय गणेश हा वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर केला.त्यानंतर मुलांनी राजस्थानच्या आकर्षक पेहरावात धीमे हाकोनी हे राजस्थानी नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रनिवेदन श्री महेश गांवस यांनी केले तर आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी श्री शशिकांत पुनाजी यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar