कुजीरा बांबोळी येथील मुष्टिफंड संस्था संचालीत मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालयाचे एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी च्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली. एकूण 160 विधाथीपैकी १५८ विधाथी यावेळी उतीर्ण झाले असून परीक्षेचा सरासरी निकाल ९९ टक्के लागला. यंदा विधालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.८ टक्के लागला आहे. या शाखेमधून ९४ विधाथीपैकी ९२ विधाथी उत्तीर्ण झाले आहेत. अनंत प्रभू म्हाबरे हा विधाथी ९५.५. टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेतून प्रथम आला. आयुष जाधव याने ९१.५ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर ईशा प्रभू तांबा हीने ९० टक्के गुण मिळवून विधालयात तिसरा क्रमांक पटकावला.
यंदा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला असुन एकूण ६६ विधाथीपैकी सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले . गोविंद शेणवी खांडेपारकर व श्रीयांत बुर्यै हे दोन्ही विधाथी प्रत्येकी ९६.५. टक्के गुण मिळवून विधालयात प्रथम आले. गोविंद शेणवी खांडेपारकर याला अकाऊंटसी, अर्थशास्त्र आणि बिजनेस स्टेडिज या तिन्ही विषयात प्रत्येकी १०० गुण मिळाले तर श्रीयान बुर्ये याला काॅपरेशन या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त झाले परवीन द्राक्षा याने ९५.८
टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत तिसरा क्रमांक पटकावला
यंदा विज्ञान शाखेतून ३३ विधाथी विशेष क्षेणी, ४९ विधाथीना प्रथम श्रेणी तर १० विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उतीर्ण झाले. वाणिज्य शाखेमध्ये एकूण ३२ विधाथी विशेष क्षेणीत, ३२ विधाथी प्रथम क्षेणीत तर दोन विधाथी द्वितीय क्षेणीत उतीर्ण झाले. दरवर्षीप्रमाणे यंदा ही विधालयाने चांगला निकालाची परंपरा राखलाबददल संस्थेचे अध्यक्ष अनिल खंवटे, उपाध्यक्ष डॉ. अजय वैद्य, सचिव सुहास सरदेसाई, कोशाध्यक्ष दिलीप धारवाडकर व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेन्द्र वेलेकर यांनी सर्व विधाथीचे, शिक्षकवर्ग चे व प्राचार्य नवनाथ परुळेकर यांचे अभिनंदन केले आहे