सेंट अँथनीची आगेकूच

.

सेंट अँथनीची आगेकूच
पणजी ः सेंट अँथनी एससी, असोल्डा यांनी मंगळवारी स्पोर्टिंग क्लब दवर्लीचा ७-४ असा पराभव करत गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच आगेकूच केली. गोवा युनायटेड स्पोर्टस् अकादमीने आायेजित हा सामना रोझरी मैदान नावेली येथे झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघ ३-३ असे बारेबरीत होते. सेंट अँथनीकडून ऍलरिच (१३वे व ४२वे मिनिट) याने दोन तर शिल्डन (६९वे मिनिट) यांनी गोल केले. दवर्लीतर्फे मॅक याने पहिल्याच मिनिटाला गोल नोंदविला. यानंतर २८व्या मिनिटाला त्याने आपला दुसरा गोल केला. त्यांचा तिसरा गोल रीव्ह डिकॉस्टा याने ५६व्या मिनिटाला केला. पेनल्टी शूटआऊटवर सेंट अँथनीकडून विल्यम, फेझर, ज्योकिम व साफिक यांनी तर दवर्लीतर्फे केवळ व्हिक्टोरिनो याने गोल केलाा. दवर्लीचा सेल्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
शापोराची अस्नोडावर मात
शापोरा युवक संघाने कळंगुट येथील पोरियट मैदानावर झालेल्या सामन्यात अस्नोडा युनायटेडचा टायब्रेकरवर ६-५ असा पराभव केला. विनायक मुळगावकर याच्या गोलाच्या जोरावर शापोराचा संघ मध्यंतरापर्यंत एका गोलने आघाडीवर होता. अस्नोडाने दुसर्‍या सत्रात कुणाल साळगावकरकरवी बरोबरी साधली. पेनल्टीवर शापोराकडून रोहन कांबळी, दिनेश मोरजकर, प्रतीक धारळकर, सोमा कोरगावकर व नीतेश साळगावकर यांनी तर अस्नोडाकडून कुणाल साळगावकर, आकाश कुडणेकर, साहील दुगडे व सनी परब यांनी गोल केले. शापोराचा गोलरक्षक सोमा कोरगावकर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कळंगुटचा केपेवर मोठा विजय
कळंगुट व्हेटरन्सने केपे व्हेटरन्सचा एकतर्फी लढतीत ४-० असा पराभव केला. कांदोळी येथील गुस्ताव मोंतेरो मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. भारताच्या १६ वर्षांखालील फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस यांनी १३व्या मिनिटाला कळंगुटला आघाडीवर नेले. यानंतर त्यांनी ४१व्या व ४४व्या मिनिटाला गोल करत हॅट्‌ट्रिक साजरी केली. ऑल्विन फर्नांडिसने चौथा गोल केला. केपेचा जाफर याडवड सामनावीर ठरला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar