पुण्यात कंपनीने विक्रेत्यांच्या संख्येत नोंदवली आठ पटींची दमदार वाढ

.
  • मीशोवरच्या विक्रेत्यांची संख्या ६ लाखांवर, त्यांच्यापैकी जवळपास निम्मे जण या प्लॅटफॉर्मवर एकमेवाद्वितिय

    पुण्यात कंपनीने विक्रेत्यांच्या संख्येत नोंदवली आठ पटींची दमदार वाढ

    पुणे, २४ मे २०२२ – मीशो या वेगाने विकसित होत असलेल्या इंटरनेट कॉमर्स कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवरील विक्रेत्यांची संख्या ६ लाखांच्या पुढे गेल्याचे जाहीर केले आहे. एप्रिल २०२१ पासून या संख्येत सात पटींची वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. पुण्यातील वाढत्या लघु उद्योगांनी गेल्या वर्षात मोठ्या प्रमाणावर मीशोवर नोंदणी केली असून कंपनीच्या झिरो कमिशन आणि झिरो पेनल्टी अशा इंडस्ट्री- फर्स्ट उपक्रमांमुळे हे शक्य झाले आहे. यातील निम्म्यापेक्षा जास्त विक्रेते केवळ मीशोवरच कार्यरत असल्यामुळे हा प्लॅटफॉर्म देशभरातील लघु आणि मध्यम व्यवसायांसाठी सर्वाधिक पसंतीचा झाल्याचे स्पष्ट होते.

    प्लॅटफॉर्मवरील पुण्याच्या विक्रेत्यांच्या संख्येत ८ पटींची प्रभावी वाढ झाली असून मे २०२१ पासून ऑर्डर्समध्ये २ पटींची वाढ झाली आहे. या भागातील आघाडीच्या विभागांमध्ये कपडे, घर सजावट, फर्निशिंग्ज, वैयक्तिक काळजी आणि स्वास्थ्य यांचा समावेश आहे.

मीशोवरील ७० टक्के पेक्षा जास्त विक्रेते अमृतसर, राजकोट आणि तिरुपुर अशा दुसऱ्या श्रेणीतील शहरांतील आहेत. कंपनीने एक लाख लघु उद्योजकांना लखपती बनवले आहे, तर जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत ५००० पेक्षा जास्त उद्योजकांना करोडपती बनवले आहे. विक्रेत्यांना मोठ्या आणि वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवत कंपनीने त्यांची मिळकत क्षमतेचा विस्तार केला आहे.

मीशोच्या सप्लाय ग्रोथ विभागाचे सीएक्सओ लक्ष्मीनारायणन स्वामीनाथन म्हणाले, ‘एमएसएमईजना उच्च विकास आणि नफ्याचे मार्जिन मिळवून देण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्मची उभारणी करत आहोत. मीशोवरील विक्रेत्यांनी जानेवारी २०२१ पासून आपल्या उत्पन्नात तिप्पट वाढ झाल्याचे पाहिले आहे. लघु उद्योगांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण विकास करण्यासाठी मीशो निभावत असलेली भूमिका समाधानकारक आहे. पुण्यातून मिळत असलेल्या दमदार प्रतिसादामुळे प्लॅटफॉर्मवरील विविध विभागांतील विक्रेत्यांच्या संख्येत प्रभावी वाढ झाली. आम्ही इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण करायचे म्हणतो, तेव्हा विक्रेत्यांना समान संधी मिळावी असा त्याचा अर्थ होतो. आज मीशा हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे, जो विक्रेत्यांमध्ये त्यांच्या शहरानुसार फरक करत नाही किंवा आमच्याकडे प्रायव्हेट लेबल प्ले अथवा होलसेल प्ले नाही. विक्रेत्यांसाठी पूरक असलेल्या उपक्रमांद्वारे आम्ही १०० दशलक्ष व्यवसायांना ऑनलाइन पातळीवर यश मिळवून देण्याच्या ध्येयाच्या दिशेने काम करत राहू.’
मीशोवरील पुण्यातले विक्रेते चंद्रशेखर नायडू म्हणाले, ‘मीशोच्या ‘झिरो कमिशन’ मॉडेलमुळे मला माझ्या उत्पादनांसाठी स्पर्धात्मक किंमती ठेवण्यास मदत झाली आणि हे विक्रेते तसेच ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. मी अलीकडे तुलनेने जास्त ग्राहक मिळवले आहेत, कारण विक्री किंमतीमध्ये कमिशनच्या अतिरिक्त खर्चाचा समावेश नसतो.’

मूळचे ओडिशा येथील असलेले चंद्रशेखर नोकरीच्या शोधत पुण्यात आले. पत्नीच्या सल्ल्याने त्यांनी २०१८ मध्ये ‘लाइफ विन’ सुरू केले आणि आपल्या ब्रँडची व्याप्ती वाढवण्याच्या हेतूने मीशोसह भागिदारी केली. मीशोवरील या कपड्याच्या ब्रँडमध्ये टीशर्ट्स, ड्रेसेस, कुर्तीज आणि पुरुषांच्या शर्टचे रिटेलिंग केले जाते. काही महिन्यांच्याच कालावधीत लाइफ विनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता त्यांना दरमहा तब्बल ७००० ऑर्डर्स मिळतात.

मीशोने डेटा- बॅक्ड मॉडेल्सची उभारणी केली आहे, ज्यामुळे युजर- फ्रेंडली अनुभव देण्यास मदत होते, विक्रेत्यांच्या अडचणी सोडवल्या जातात आणि ई- कॉमर्स यंत्रणेमध्ये जास्त प्रमाणात पारदर्शकता दिसून येते.

भारतातील बहुतेक लहान उद्योग अजूनही तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि मोबाइल फर्स्ट झालेले नाहीत. ग्राहक व विक्रेत्यांसाठी सर्वसमावेशक ई- कॉमर्स मोबाइल अप तयार करणारी मीशो ही पहिली भारतीय कंपनी असून हा कंपनीच्या देशातील लहान उद्योगांचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. या अपच्या माध्यमातून विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येतो, मग ते ऑर्डर्स प्रक्रिया असो, पेमेंट ट्रॅकिंग असो किंवा इनव्हेंटरीचे व्यवस्थापन.

About Meesho
Meesho is India’s fastest-growing internet commerce platform. With a vision to enable 100 million small businesses, including individual entrepreneurs, to succeed online, Meesho is democratising internet commerce and bringing a range of products and new customers online. The Meesho marketplace provides small businesses, which includes SMBs, MSMEs and individual entrepreneurs, access to millions of customers, selection from more than 700+ categories, pan-India logistics, payment services and customer support capabilities to efficiently run their businesses on the Meesho ecosystem.
# # #
Media Contact:
Name: Tejaswini Vishwakarma
Agency: Adfactors PR
Designation: Senior Account Executive
Contact no: 8169517216
Email id: tejaswini.v@adfactorspr.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar