एल अँड टी ठरला जागतिक इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रातील सर्वात बलशाली ब्रँड

.

 

ब्रड फायनान्सने तयार केलेल्या मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी 50 ब्रँड्स अहवालात समाविष्ट असलेली एकमेव भारतीय कंपनी

मुंबई, २५ मे २०२२ – लार्सन अँड टुब्रो (एल अँट टी) या ईपीसी प्रकल्प, हाय- टेक मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिसेस क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय बहुराष्ट्रीय कंपनीचा ब्रँड फायनान्सतर्फे ५० ग्लोबल इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन (ई अँड सी) कंपन्यांमध्ये ‘सेकंड स्ट्राँगेस्ट ब्रँड’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

लंडन- स्थित कंपनीने आपल्या ‘इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन 50- 2022’ या अहवालात एल अँड टीला ‘थर्ड फास्टेस्ट ग्रोईंग ब्रँड’चेही स्थान दिले आहे. ‘मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी फर्म्स’मध्ये समाविष्ट करण्यात आलेली एल अँड टी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. एल अँड टी सध्या ५० देशांत कार्यरत असून गेल्या वर्षभरात कंपनीच्या ब्रँड मूल्यामध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे.

या सन्मानाविषयी एल अँड टीचे प्रतिनिधी म्हणाले, ‘ब्रँड हा केवळ एक नाव किंवा लोगोपेक्षा बरंच काही असतं. ब्रँड म्हणजे विश्वास, प्रतिष्ठा, मूल्य यंत्रणा आणि विश्वासार्हता असते. ब्रँड फायनान्सतर्फे इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रात दुसऱ्या सर्वात बलशाली जागतिक ब्रँडचा मिळालेला हा सन्मान आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. हा सन्मान आमच्या टीमची गुणवत्तेप्रती असलेली बांधिलकी तसेच दिलेले आश्वासन पूर्ण करण्याच्या आमच्या क्षमतेवर असलेला ग्राहकांचा विश्वास यांची पावती देणारा आहे.’

‘आमचा ब्रँड तसेच व्यवसायाच्या भविष्याविषयी आम्ही उत्सुक आहोत. नव्या बाजारपेठा आणि नव्या क्षेत्रांत आम्ही सातत्याने विकास व विस्तार करत असून आम्हाला विश्वास आहे, की आम्ही या दमदार पायावर अशाच प्रकारे उभारणी करत राहू आणि जागतिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून आमचे स्थान आणखी बळकट करू.’

एल अँड टी ने आपल्या ब्रँडच्या ताकदीमध्ये लक्षणीय सुधारणा केली असून कंपनीचा ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (बीएसआय) ७.१ गुणांनी वाढून १०० पैकी ८३.९ वर पोहोचला आहे. मोस्ट व्हॅल्यूएबल ग्लोबल ई अँड सी 50, 2022’ ब्रँड्समध्ये समाविष्ट असलेली एल अँड टी ही एकमेव भारतीय कंपनी आहे.

ब्रँड एल अँड टी पायाभूत सुविधा, बांधकाम, हायड्रोकार्बन, अवजड अभियांत्रिकी आणि संरक्षण अभियांत्रिकी अशा महत्त्वाच्या क्षेत्रांना तंत्रज्ञानयुक्त सहाय्य करत असते. कठीण प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या कंपनीच्या प्रतिष्ठेमुळे एल अँड टीला या क्षेत्रातील उच्चभ्रू कंपन्यांमध्ये स्थान मिळालेले आहे. कंपनीचे देश व जगभरात सर्वात मोठे, लांब आणि उंच प्रकल्प आहेत, ही बाब तंत्रज्ञानाभिमुख ई अँड सी ब्रँड सहजपणे कोणतेही आव्हान पेलू शकते याचा पुरावा आहे.

प्रत्येक वर्षी ब्रँड फायनान्सद्वारे जगातील सर्वात मोठ्या ५००० ब्रँड्सची कठोर चाचणी घेतली जाते आणि जवळपास १०० अहवाल प्रसिद्ध करत सर्व क्षेत्रे व देशांतील ब्रँड्सना रँकिंग दिले जाते. इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या ५० मोस्ट व्हॅल्यूएबल अँड स्ट्राँगेस्ट ब्रँड्सचा वार्षिक ब्रँड फायनान्स इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्शन ५० रँकिंगमध्ये समावेश केला जातो.

आपल्या सहाव्या अहवालात ब्रँड फायनान्सने ३६ देश आणि २९ क्षेत्रे १००,००० सहभागींचे वार्षिक सर्वेक्षण केले आहे. ब्रँड व्हॅल्यूएशन कन्सलटन्सीद्वारे ब्रँड मूल्याचे मिळकतीची विशेषतः ब्रँड प्रतिष्ठेशी निगडीत सद्य मूल्य अशी व्याख्या करण्यात आली असून ब्रँडचे मार्केंटिंगशी संबंधित इन्टँजिबल असेट असे वर्णन करण्यात आले आहे.

ब्रँड फायनान्सद्वारे प्रत्येक ब्रँडला १०० पैकी ब्रँड स्ट्रेंथ इंडेक्स (बीएसआय) स्कोअर दिला जातो, जो ब्रँड मूल्यात समाविष्ट होतो. या स्कोअरनुसार प्रत्येक ब्रँडला AAA+ पर्यंत संबंधित ब्रँड रेटिंग मूल्यांकन कन्सलटन्सीच्या क्रेडिट रेटिंगसारख्या फॉरमॅटनुसार दिले जाते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar