*स्वीडिश सस्टेन टेक कंपनी वेआउट आणि ईपी कामत ग्रुपद्वारे कार्बन फूटप्रिंट खाली आणण्यासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञान सादर*
किमान इको-फूटप्रिंटसह स्थानिक पातळीवर पिण्याचे आणि स्वयंपाकाच्या पाण्याचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी अग्रगण्य जागतिक दर्जाचा उपाय
नेक्स्ट-जेन तंत्रज्ञान जे संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते आणि पाण्याच्या शुद्धतेवर डेटा संग्रहित करते
गोवा, २८ मे, २०२२: पुरस्कारप्राप्त सस्टेन-टेक कंपनी वेआउट आणि ईपी कामत ग्रुपने शनिवारी डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री, गोवा यांच्या उपस्थितीत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. उल्फ स्टेनरहॅग – सीईओ, वेआउट इंटरनॅशनल, श्री. राजकुमार कामत, व्यवस्थापकीय संचालक, ईपी कामत ग्रुप, आणि अतिका चोना, सस्टेनेबिलिटी अँड ग्रोथ, ग्लोबल वेआउट इंटरनॅशनल यांच्या उपस्थितीत कंपन्यांनी अशा पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा खुलासा केला ज्याचा उपयोग कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आणि राज्याच्या भविष्यातील संसाधनांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला जाऊ शकतो.
करारामध्ये जागतिक दर्जाचे एक असा अग्रगण्य उपाय समाविष्ट आहे, ज्याद्वारे पृथ्वीवर कोठेही किमान इको-फूटप्रिंटसह स्थानिक पातळीवर पिण्याचे आणि स्वयंपाकाचे पाणी तयार आणि वितरित केले जाऊ शकते. या नाविन्यपूर्ण जलशुद्धीकरण आणि वितरण प्रणालीमुळे, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी केला जाऊ शकेल असे समजले जाते.
स्वीडिश सस्टेन-टेक कंपनीचे सीईओ, उल्फ स्टेनरहॅग यांनी आपले मत व्यक्त केले की, ही कंपनी उच्च दर्जाच्या, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पिण्याच्या पाण्याच्या उपायाच्या स्थानिक कव्हरेजसाठी जल उत्पादन प्रणाली प्रदान करते, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणखी मदत होते. “एक एकल मार्ग प्रणाली, कोणत्याही उपउत्पादनाशिवाय, ३,००० व्यक्तींना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवते, त्याचवेळी, दरवर्षी ४८३ टन हरितगृह वायू आणि ५.७ दशलक्ष एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या बाटल्यांना इकोसिस्टममध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते”, श्री. स्टेनरहॅग पुढे म्हणाले.
यावेळी बोलताना, श्री. राजकुमार कामत, व्यवस्थापकीय संचालक, ईपी कामत ग्रुप, यांनी गोव्याच्या स्वच्छता आणि सांडपाणी पुनर्वापर विभागातील प्रमुख म्हणून ईपी कामत ग्रुपच्या स्थापनेवर प्रकाश टाकला. एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या बाटल्यांचे उच्चाटन हे त्यांच्या स्वच्छ, हिरवे आणि सुरक्षित ग्रहाच्या मुख्य दृष्टीकोनातील एक पाऊल आहे.
“आम्हाला या जागतिक दर्जाच्या अशा उपायामध्ये वेआउट सह भागीदारी करताना आनंद होत आहे, ज्याद्वारे लाखो एकदाच वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर संपुष्टात आणतो. अशा प्रकार, विशेषत: डिझाइन केलेल्या मायक्रोफॅक्टरीद्वारे सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवताना हजारो टन हरितगृह वायू कमी करतो.” श्री. कामत पुढे पुढे म्हणाले, “गोव्यात, मला विश्वास आहे की, पर्यटन स्थळे, औद्योगिक वसाहती तसेच शिक्षण आणि इतर संस्थांमध्ये याचा प्रचंड उपयोग होईल.”
ईपी कामत ग्रुप, गोवा सरकारच्या स्वच्छ भारत मिशनशी संबंधित आहे आणि त्याच्याद्वारे सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी) आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे (ईटीपी)द्वारे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी सानुकूलित उपाय प्रदान केला गेला आहे.
वेआउट आणि ईपी कामत ग्रुप यांच्यातील सहकार्याने गोव्यातील पर्यावरणपूरक जल उपायाची परिस्थिती पुन्हा परिभाषित केली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल आणि शाश्वत पर्यावरणासाठी योगदान देता येईल.
सुश्री अतिका चोना, वेआउट येथील शाश्वतता आणि वाढ संचालक यांनी आपले मत व्यक्त केले की, ईपी बायोकंपोझिटसह भागीदारीमध्ये गोव्यातील १७० दशलक्ष प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमी करून १४,५००टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्याची क्षमता आहे. “आम्ही गोव्याचा कायापालट पाहण्यासाठी आणि त्याच्या शाश्वततेच्या महत्त्वाकांक्षेला गती देण्यासाठी उत्सुक आहोत”, त्या म्हणाल्या.
दोन्ही कंपन्यांमधील भागीदारी करारावर स्वाक्षरी करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या कंपन्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. “वेआउट इंटरनॅशनल आणि ईपी कामत ग्रुप या दोघांचेही अभिनंदन केले. गोवा राज्यात प्लॅस्टिकमुक्त पाणी कचरा हा दोन्ही संस्थांनी उचललेला एक चांगला उपक्रम आहे. मला वाटते की सरकार या कराराला पूर्ण पाठिंबा देणार असून भविष्यात दोन्ही संस्थांना पाठिंबा देईल.आम्ही देखील प्लॅस्टिकमुक्त गोव्यावर काम करत असून, “ग्रीन गोवा, क्लीन गोवा” यासाठी निश्चितच मदत होईल, असे मुख्यमंत्री डॉ.सावंत म्हणाले.
या कार्यक्रमाला डॉ. गणेश गावकर, अध्यक्ष, जीटीडीसी, आणि श्री. अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को, अध्यक्ष, जीआयडीसी, सुश्री स्वेतिका सचान, सीईओ, गोवा-आयपीबी, श्री. गुरुदास पिलार्णेकर- संचालक, नगरविकास विभाग, नितीन कुंकोलेंकर – अध्यक्ष, एमएआयटी, नीलेश शाह – अध्यक्ष, टीटीएजी, आणि आनंद चॅटर्जी, महाव्यवस्थापक, प्लॅनेट हॉलीवूड बीच रिसॉर्ट आदी मान्यवर उपस्थित होते.