गोवा वेल्हाला नमवत ड्युन्स राज्य अंतिम फेरीत ड्युन्स एससी मांद्रेने गोवा वेल्हा एससीचा टायब्रेकरवर ६-५ असा पराभव करत गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम

.

गोवा वेल्हाला नमवत ड्युन्स राज्य अंतिम फेरीत
ड्युन्स एससी मांद्रेने गोवा वेल्हा एससीचा टायब्रेकरवर ६-५ असा पराभव करत गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गोवा युनायटेड स्पोर्टस् अकादमी यांनी आयोजित या स्पर्धेतील हा सामना शनिवारी कळंगुट येथील पोरियट मैदानावर झाला. विजेतेपदासाठी सोमवारी ड्युन्स एससी व रोझमन क्रुझ एससी नागवा वेर्णा यांच्यात सामना होणार आहे.
गोवा वेल्हाने सामन्याच्या सुरुवातीच्या मिनिटांत वर्चस्व राखले. प्रवीण नाईक याने विसाव्या मिनिटाला गोल करत त्यांना आघाडीवर नेले. ड्युन्सने यानंतर पुनरागमन करत दुसर्‍या सत्रात ४५व्या मिनिटाला सिल्वेस्टर डायस याच्याकरवी गोल केला.
पेनल्टी शूटआऊटमध्ये ड्युन्सक़डून लेस्ली ब्रिटो, सिल्वेस्टर डायस, ऋषिकेश किनळेकर, जेसन फर्नांडिस व अल्बर्टो ब्रिटो यांनी गोल केले. गोवा वेल्हातर्फे कुणाल कुंडईकर, सुपूर्वा कुंडईकर, लोकेश तलवार व भावेश गावस यांनी गोलजाळीचा वेध घेतला. ड्युन्सचा जेसन फर्नांडिस सामनावीर ठरला.
रविवारी व्हेटरन्सच्या अंतिम फेरी रविवारी कळंगुट व्हेटरन्स विरुद्ध बार्देश व्हेटरन्स असा सामना कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर रंगणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें