येथील खालचावाडा श्री नारायणदेव देवस्थानतर्फे आयोजित पेडणे तालुका मर्यादित ‘मी सावरकर बोलतोय’ वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात कु सलोनी साटेलकर व कनिष्ठ गटात कु सना साटेलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.ह्या स्पर्धेत 15 जणांनी सहभाग घेतला होता.
कनिष्ठ गटात द्वितीय कु तन्मय खर्बे, तृतीय कु वेदांत कशाळकर उत्तेजनार्थ कु पलक गडेकर व वीर गोकर्णकर यांना देण्यात आले.वरिष्ठ गटात द्वितीय कु महेश गोखरणकर तृतीय कु आदिती सावळ देसाई उत्तेजनार्थ कु पुनीत तळावणेकर व शिवा शरद तोरस्कर याना देण्यात आले.स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास निवृत्त शिक्षक नारायण धारगळकर उपस्थित होते.सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली,तुरुंगवास तसेच देशभक्ती, राष्ट्रभक्ती व हिंदुत्ववादी विचारांचे ते पुरस्कर्ते होते.जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ह्यासाठी त्याचा वावर होता. त्याने ब्रिटिशांविरुद्ध लढा देताना हाल अपेस्था सोसल्या,दोन जन्मठेपेची शिक्षा भोगली व ती भोगताना तुरूंगातून कमला कादंबरी व विपुल लेखन करून साहित्य क्षेत्रांतसुद्धा ठसा उमटविला.त्यांच्या कार्याचा वसा घेत आत्मसात करण्याची खरी गरज आहे,असे निवृत्त शिक्षक धारगळकर यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्राम तारी, पुरस्कर्ते मधुकर माज्जी, हरेश मयेकर, परीक्षक भारत बेतकेकर व सत्यवान पालयेकर उपस्थित होते.परीक्षक बेतकेकर यांनी सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले व सावरकर जयंतीनिमित्त सावरकरांचे जीवनचरित्र योग्य व प्रभावीपणे मांडल्याबद्दल अभिनंदन केले.प्रारंभी प्रमुख पाहुणे नारायण धारगळकर हस्ते दीपप्रज्वलन व सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी देवस्थानचे माजी अध्यक्ष राधाकृष्ण नागवेकर, उपाध्यक्ष सूरज रेडकर, सचिव हनुमंत गोकर्णकर, शशिकांत बांदेकर आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.देवस्थानचे अध्यक्ष विश्राम तारी यांनी प्रास्ताविक व स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. सुत्रनिवेदन चंद्रहास दाभोलकर तर अध्यक्ष विश्राम तारी यांनी आभार मानले.