गोवा टायगर कप २०२२’चा रोझमन क्रुझ चॅम्पियन

.

 

 

 

‘गोवा टायगर कप २०२२’चा रोझमन क्रुझ चॅम्पियन
पणजी ः रोझमन क्रुझ नागवा वेर्णा यांनी ड्युन्स एससी मांद्रेचा २-० असा पराभव करत पहिल्या गोवा टायगर कप २०२२ अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कांदोळी येथील डॉ. गुस्ताव मोंतेरो मैदानावर सोमवारी हा अंतिम सामना खेळविण्यात आला. महाराष्ट्र फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली.
दक्षिण गोवा तसेच उत्तर गोवा विभाग विजेत्यांमधील हा सामना सुरुवातीपासून चुरशीचा झाला. खाते उघडण्याची शर्यत द. गोवा विजेत्या रोझमन क्रुझ यांनी जिंकली. त्यांच्या स्टीफन सातारकर यान २५व्या मिनिटाला हेडरद्वारे पहिला गोल केला. ड्युन्सने यानंतर सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. परंतु, रोझमन क्रुझच्या शेल्डन परेरा याने ५५व्या मिनिटाला दुसरा गोल केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. लहान-लहान पासेसवर भर देत रोझमनने या दुसर्‍या गोलाची नोंद केली. रोझमन क्रुझचा रोमारियो दा कॉस्टा अंतिम सामन्याचा मानकरी ठरला. ‘मिसेस इंडिया अर्थ २०१९’ स्पर्धेत पहिली उपविजेती ठरलेल्या जेसिका स्नोक यांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला. ड्युन्स एससीचा ऋषिकेश किनळेकर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलरक्षक ठरला. मारियो आगियार यांनी त्याला चषक व ५००० रुपये रोख प्रदान केले. रोझमन क्रुझचा स्टीफन सातारकर स्पर्धावीर ठरला. त्याला गोवा युनायटेड एसएचे अध्यक्ष फॅबियन डिसोझा यांनी चषक व ५,००० रुपये प्रदान केले. दक्षिण गोवा विभाग उपविजेता सेंट अँथनी एससी असोल्डा यांना ३०,००० रुपये व चषक जॉनी फर्नांडिस यांनी प्रदान केला. उत्तर गोवा उपविजेत्या गोवा वेल्हा एससीला ३०,००० रुपये व चषक ग्रेगरी डिसोझा यांनी दिला. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू डँझिल फ्रेंको यांनी राज्य उपविजेतेपदाचा करंडक व ६०,००० रुपये ड्युन्स एससीला प्रदान केले. भारतीय फुटबॉल प्रशिक्षक असोसिएशनचे संचालक दिनवेश नायर यांनी विजेत्या संघाल १ लाख रुपये व झळाळता करंडक प्रदान केला.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar