इंडियन रेड क्रॉस सोसायटी बादैश शाखेच्या कार्यकारिणी समीतीची बैठक प्रा. सुभाष कौठणकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. दिगंबर नाईक यांच्या

.
इंडियन रेड क्रॉस सोसायटी बादैश शाखेच्या कार्यकारिणी समीतीची बैठक प्रा. सुभाष कौठणकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. दिगंबर नाईक यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी बादैश शाखा व वृंदावन इन्स्टिट्यूट  आफ नसरी एज्युकेशन काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच होम नसिग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे ठरले अशा प्रशिक्षण वर्गातून अनेक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. दिगंबर नाईक यांनी दिली.

बैठकीला डॉ. नाईक, ॲड. ईशान उसपकर, सलीम ईसानी, नरूददीन शेख, व मंगला नाईक उपस्थित होते. बैठकीत ईशान उसपकर यांनी मागील बैठकीचा इतिवृत्त चे वाचन केले. सलीम ईसानी यांनी दोन बर्षाचा जमा खर्च सादर केला
बैठकीत नुतन समिती निवडणासाठी लवकरच बादैश शाखेच्या सर्व सभासदांची एक बैठक घेण्याचे ठरले. शाखेचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्यात सभासद नोंदणीवर भर देण्याचें ठरले
म्हापसा नगरपालिकेची जुनी इमारत मोडकळीस आल्या चे निमित्त करून इंडियन रेड क्रॉस बादैश शाखेचे कार्यालय बंद करण्यास सांगून त्या ऐवजी रेड क्रॉस शाखेला पर्यायी दोन गाळे टॅक्सी स्डेड जवळील इमारतीच्या पहिल्या माळावर नेण्यात आले. परंतु येत्या दोन वर्षांपासून त्या गाळाना आरोग्य खात्याचा ना हरकत दाखला न मिळाल्याने त्याचा ताबा अजून शाखेकडे देण्यात आला नाही. कार्यालय बंद असल्याने गेल्या दोन वर्षापासून नागरिकांची मोफत प्रथमोपचार सेवा बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे
सेवा लवकरात लवकर सुरू करता यावी यासाठी प्रथम नगराध्यक्ष, आमदार आणि रेड क्रॉस चे राज्य अध्यक्ष राज्य पालाना भेटून कार्यालयाचा ताबा मिळविण्याचे ठरले. विद्यार्थी मध्ये मानवतेची सेवा जागृत करण्यसाठी जे. आर. सी. व वाय
आर. सी. मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेण्याचें ठरले तसेच ग्रामपातळीवर महिलांसाठी प्राथमिक प्रथमोपचार कार्यशाळा आयोजित करण्याचे ठरले. डॉ. नाईक यांनी मधुमेह रुग्णासाठी आहार व
व्यायाम या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्याचे सुचविले प्रा. सुभाष कौठणकर यांनी स्वागत केले तर ॲड. ईशान उसपकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar