सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीओ निमुलन ची जनजागृती या उद्देशाने या रेलीचे आयोजन करण्यात आले होते. या रेलीत ८० जणांन सहभागी झाले होते यामध्ये ६ वर्षाच्या मुलगा ते ५१ वयापर्यंत चे लोक सहभागी झाले होते. म्हापसा बोडगेस्वर देवस्थान पासून सुरू झालेली रेली खोली सीम, म्हापसा टॅक्सीस्टेंड कडून बोडगेस्वर देऊळ पर्यंत रेली काढण्यात आली. ५ ते १५ पर्यंतच्या मुलांसाठी स्लो सायकलिंग चे आयोजन ही करण्यात आले होते या रॅलीला उत्तम प्रतिसाद लाभला. या रेलीचे उदघाटन अध्यक्ष डॉ. प्रतीक्षा खलप यांनी केले. यावेळी प्रकाश पिळर्णकर, प्रकल्प अधिकारी शांत गुडनवार उपस्थित होते. म्हापसा नगरपालिका नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर यांनी यावेळी पोलिओ हा रोग पुर्णपणे नाहिसा झाला असून १२२ देशामधून २.५ बिलीयन मुले पोलिओ मुक्त झालाचे सांगितले. रेली यशस्वी होण्यासाठी म्हापसा टॅफीक पोलीसांनी सहकार्य केले.