मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचा राजभवन येथे प्रतिथयश राज्य पुरस्काराने गौरव
गोवा, १ जून २०२२- मणिपाल हॉस्पिटल्स, गोवा ला राजभवन येथे माननीय मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आणि माननीय राज्यपाल श्री पी एस श्रीधरन् पिल्लई यांच्या हस्ते तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत दिनांक ३१ मे २०२२ रोजी गोव्याच्या ३५ व्या राज्य स्थापना दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रतिथयश पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी राज्यात कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था म्हणून तसेच राज्याच्या प्रगती आणि विकासातील सामाजिक योगदानाची दखल घेऊन मणिपाल हॉस्पिटल्स गोवा ला एका मानद पदवीने गौरवण्यात आले.
यावेळी बोलतांना मणिपाल हॉस्पिटल्स गोव्याचे हॉस्पिटल डायरेक्टर श्री सुरेंद्र प्रसाद यांनी सांगितले “ आमची गोव्यातील नागरिकांची सेवा आणि प्रयत्नांची पोच म्हणून असा प्रतिथयश राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे ही मानाची गोष्ट आहे. आम्ही सातत्याने एक कार्यक्षम संस्था म्हणून काम करून राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण सेवा देत राहू.”