अॅड्स सह भारताच्या डिजिटल जाहिरात उद्योगात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी Vi ने ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याकरता जाहिरातदारांसाठी एआय/एमएल आधारित अॅड-टेक प्लॅटफॉर्म

.

मुंबई,

Vi अॅड्स सह भारताच्या डिजिटल जाहिरात उद्योगात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी Vi ने ग्राहकांशी अधिक प्रभावीपणे जोडले जाण्याकरता जाहिरातदारांसाठी एआय/एमएल आधारित अॅड-टेक प्लॅटफॉर्म केला सादर
Vi अॅड्स Vi च्या मालकीच्या मालमत्तेसह बाह्य मीडिया चॅनेलवर अचूक सेवा सादर करणार
विपणकांना मोहिमा तयार करण्यात मदत करण्यासाठी सेल्फ-सर्व्ह इंटरफेस आणि हायपर लोकल स्तरावर निश्चित पोहोच सक्षम करण्यासाठी वैयक्तिकृत इनसाईट

भारतातील डिजिटल क्रांतीमुळे जाहिरात-तंत्रज्ञान उद्योगात नावीन्यपूर्ण आणि लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उद्योगातील गुंतवणुकीचे प्रमाणही वाढले आहे. सानुकूलित प्लॅटफॉर्मवर आशय आणि प्रोग्रामॅटिक मीडिया बाईंग ही आता सर्वसाधारण गोष्ट बनेल. डिजिटल अॅडेक्स सर्वशक्तीनिशी अव्याहतपणे पुढे सरकत असताना Vi चे उद्दिष्ट अब्जावधी डॉलरच्या भारतीय जाहिरात उद्योगात एक प्रमुख सदस्य म्हणून सहभागी होण्याचे आहे. यासह, भारतातील आघाडीच्या दूरसंचार ऑपरेटर Vi ने आज स्वतःचा जागतिक दर्जाचा अॅड-टेक प्लॅटफॉर्म Vi Ads (Vi अॅड्स) सादर केल्याची घोषणा केली. हा एक एआय/एमएल आधारित अॅड-टेक प्लॅटफॉर्म असून तो अत्याधुनिक आणि ROI केंद्रित आहे आणि विपणकांना एक प्रोग्रामॅटिक मीडिया बाईंग प्लॅटफॉर्म देते.

Vi च्या सखोल डेटा विज्ञान तंत्रज्ञानावर स्वार होत Vi Ads विपणकांना ऑपरेटरच्या २४३ दशलक्ष पेक्षा जास्त सदस्यांसह Vi च्या मालकीचे डिजिटल मीडिया Vi App, Vi Movies आणि TV App आणि SMS, IVR कॉल सारख्या पारंपारिक चॅनेल अशा विविध माध्यमातून संलग्न करण्यास सक्षम करेल. Vi Ads च्या मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ते मीडिया निरपेक्ष असेल आणि विपणकांना बाह्य मीडिया चॅनेल आणि Vi Ads च्या प्रकाशक भागीदारांसोबत Vi वापरकर्त्यांशी संलग्न करण्यासाठी सक्षम करेल.

याव्यतिरिक्त Vi Ads सेल्फ-सर्व्ह इंटरफेस सादर करतील. त्यामुळे मार्केटर्स मोहिम तयार करण्यापासून, मोहिमेच्या कार्यप्रदर्शनाची नोंद ठेवणे तसेच चांगल्या प्रकारे जाहिरात मोहीम चालविणे अशा प्रकारे त्यांच्या मोहिमेवर संपूर्ण नियंत्रण मिळवून सक्षम होतील. Vi Ads हे संपूर्ण मोहिमेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवलेले आहे. त्यामुळे जागरूकता, विचार किंवा खरेदी अशा प्रत्येक कामातून जाहिरातदारांना पोहोच वाढविण्यासाठी, लीड निर्माण करण्यासाठी किंवा विक्री वाढवण्यासाठी सेवा दिली जाते. प्रगत वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणीची सुलभता यांचे संयोजन मोठ्या एजन्सी आणि एसएमईंना सारखेच आकर्षित करेल.

गेल्या १० वर्षांत डिजिटल AdEx २७%च्या चक्रवाढ वार्षिक विकास दराने वाढला आहे. महामारीच्या काळातही, जेव्हा इतर सर्व माध्यमांमध्ये घट दिसून आली, तेव्हा डिजिटल AdEx मध्ये लक्षणीय वाढ झाली. मॅडिसन जाहिरात अहवाल २०२२ नुसार प्रोग्रॅमॅटिक मीडिया बाईंगने भारतात दृढपणे मार्ग काढला आहे आणि त्याचा वाटा वर्ष दर वर्ष वाढतच असून आता ४२% वर आहे.

Vi Ads सादर करताना Vi चे सीएमओ अवनीश खोसला म्हणाले ” विश्वासार्ह माहिती आणि सुधारित पोहोच ही आजच्या मार्केटर्ससमोरील दोन सर्वात मोठी आव्हाने आहेत. आमच्या प्रोग्रामॅटिक प्लॅटफॉर्म Vi Ads च्या मदतीने आम्ही या आव्हानांना उपाय देत आहोत. प्रथम यामुळे मार्केटर्सना अनन्य प्रेक्षक वर्ग, स्वारस्य गट आणि डेटावर आधारित Vi ची आमच्या ग्राहकांची सखोल माहिती वापरून व्युत्पन्न केलेली निश्चित उद्दिष्ट मापदंड हे लाभ मिळणार आहेत. दुसरे म्हणजे यातून जाहिरातदार केवळ Vi च्या स्वतःच्या डिजिटल मीडिया जसे की Vi App आणि Vi Movies & TV अॅपवर त्यांच्या निवडलेल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील एवढेच नाही तर बाह्य थर्ड पार्टी प्रोग्रामॅटिक मीडिया आणि SMS आणि IVR कॉल च्या पारंपारिक चॅनेलवर देखील पोहोचतील. हा एक साधा, वापरण्यास सोपा आणि अत्यंत कार्यक्षम उपाय आहे जो विपणकांना कोणत्याही वेळी सर्वात संबंधित मेसेजिंगसह योग्य लक्ष्य गटापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसेच आम्ही आमची डिजिटल मालमत्ता आक्रमकपणे तयार करून तिचा विस्तार करत असल्यामुळे Vi ला कमाईची संधी देखील पुरवत आहे.”

Vi Ads प्लॅटफॉर्म प्रेक्षक पायाभूत सुविधा आणि प्रोग्रामॅटिक सोल्यूशन्सचा जागतिक पुरवठादार असलेल्या TorcAi च्या भागीदारीत तयार करण्यात आला आहे. नवीन ब्रीड टेकसह लेगसी मार्केटिंग आणि जाहिरात तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म एकत्र जोडण्यासाठी प्रगत डेटा विज्ञान आणि मशीन लर्निंगचा लाभ घेत आहे. TorcAi माध्यम मूल्य साखळी भागधारकांना संस्थात्मक स्तरावर डेटा आणि सक्रियकरण चॅनेल एकत्र आणून प्रेक्षक मालमत्ता संघटन तयार करण्यात आणि त्याला चालना देण्यात मदत करते.

TorcAl डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित वर्मा म्हणाले, “ही भागीदारी आणि Vi Ads प्लॅटफॉर्मचा विकास Vi ला त्यांच्या विस्तृत ग्राहकांना जाहिरातदार आणि प्रकाशकांशी जोडून योग्य वेळी योग्य संदेश देण्यासाठी सक्षम करेल.”

आम्ही Vi सोबत दीर्घ संबंधाची अपेक्षा करतो आणि सतत विकसित होत असलेल्या डिजिटल पार्श्वभूमीवर ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे गुंतण्यासाठी डेटाचा वापर करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या जागतिक दर्जाची उत्पादने आणि तंत्रज्ञान वितरित करण्याच्या संधीचे स्वागत करतो.”

About Vodafone Idea Limited:

Vodafone Idea Limited is an Aditya Birla Group and Vodafone Group partnership. It is India’s leading telecom service provider. The Company provides pan India Voice and Data services across 2G, 3G, 4G and has a 5G ready platform. With the large spectrum portfolio to support the growing demand for data and voice, the company is committed to deliver delightful customer experiences and contribute towards creating a truly ‘Digital India’ by enabling millions of citizens to connect and build a better tomorrow. The Company is developing infrastructure to introduce newer and smarter technologies, making both retail and enterprise customers future ready with innovative offerings, conveniently accessible through an ecosystem of digital channels as well as extensive on-ground presence. The Company is listed on National Stock Exchange (NSE) and Bombay Stock Exchange (BSE) in India.

The company offers products and services to its customers in India under the TM Brand name “Vi”.
For more information, please visit: www.MyVi.in

For further information: Nilkantha Ray| nilkantha.ray@adfactorspr.com | 7797249494

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar