हरमल येथील अवर लेडी ऑफ माऊंट कार्मेल हायस्कुल चा शालांत परीक्षेचा 94 टक्के निकाल लागला.शाळेच्या ह्या उत्कृष्ट निकालाबद्दल पालक वर्गात अभिनंदन केले जात आहे.
यंदाच्या परीक्षेत विद्यालयातून 50 विध्यार्थी परीक्षेस बसले होते,त्यात 15 विध्यार्थी विशेष प्राविण्य,19 विध्यार्थी प्रथम वर्ग व 13 विध्यार्थी द्वितीय वर्गात उत्तीर्ण झाले.विद्यालयाची कु वेदांती व्ही.वस्त 88.17 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. कु रोशनी आर.वानखली 87 गुण तर कु जय संजय नाईक 85.33 टक्के गुण मिळवून विद्यालयात तृतीय आला.विद्यालयाच्या ह्या घवघवीत यशाबद्दल हायस्कुलचे मुख्याध्यापीका आवेलिन दांचो यांनी 100 टक्के निकालाची अपेक्षा केली होती व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे फेरमूल्यांकन करण्यात येईल असे सांगितले.हायस्कुलचे व्यवस्थापक फा.रोलंड फेर्नांडिस तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष व पदाधिकर्यांनी मुखायद्यापीका,शिक्षक वर्ग,विध्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.