.

हरमल येथील हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या पंचक्रोशी हायस्कुल विभागाने गोवा शालांत मंडळाच्या 2022 च्या परीक्षेत 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली.विद्यालयाच्या ह्या घवघवीत यशाबद्दल पंचक्रोशीत कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

यंदाच्या  निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे 72 विद्यार्थ्यापैकी 51 विशेष प्राविण्य,18 प्रथम वर्ग केवळ 3 विध्यार्थी द्वितीय वर्गात उत्तीर्ण झाले.

यंदा हायस्कुलची कु ह्रिलेखा (Hrilekha) हेमंत नाईक 97 टक्के (584 गुण) मिळवून विद्यालयात व दोन्ही हायस्कुलमधून प्रथम आली. कु शौनक महेश पै 94 टक्के (564 गुण) व कु पल्लवी हनुमंत वस्त 94 टक्के (561 गुण) मिळवून तृतीय आली. विद्यालयाच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर
यांनी गुणवंत विद्यार्थ्यी व पालकांचे कौतुक केले आहे.विद्यालयातील शिक्षक वर्गानी उत्कृष्ट मेहनत घेऊन मार्गदर्शन केले तसेच जादा शिकवणी वर्ग घेऊन त्यांना प्रोत्साहित केले व निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर व अध्यापक वर्गाचे अभिनंदन केले.या उत्कृष्ट निकालाबद्दल मुख्यध्यपिका स्मिता पार्सेकर, अध्यापक वर्ग तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष देऊ गडेकर व पदाधिकारी व सदस्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

पेडणे तालुक्यातील अग्रगण्य अश्या संस्थेच्या अकरावी वाणिज्य, विज्ञान, कला तसेच व्यावसायिक विभागासाठी प्रवेश सुरू केला असल्याचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर व प्राचार्य गोविंदराज देसाई यांनी कळविले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar