न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये दीक्षा सोहळा

.

केरी न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये दीक्षा सोहळा
हरमल प्रतिनिधी
केरी पेडणे येथील केरी – तेरेखोल परिसर विकास, कल्याण आणि शिक्षण संस्था संचालित न्यु इंग्लिश पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि हायस्कुलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभ दीक्षा समारंभ संपन्न झाला.

यावेळी शालेय व्यवस्थापनाचे व्यवस्थापक तातोबा तळकर, सचिव नंदकिशोर झालबा, उपाध्यक्ष विठ्ठल गडेकर, खजिनदार व्रजेश केरकर, सदस्य विनायक गाड , मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर आणि शिक्षक व पालक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना तातोबा तळकर यांनी शाळेने यावर्षी शालांत मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. तसेच प्रत्येक मुलांनी दर्जात्मक शिक्षण घेऊन आपले कुटुंब, समाज, शाळा आणि पर्यायाने देशाचे नाव अमर करावे असे आवाहन केले.

नीलम महालदार यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांचे स्वागत तसेच सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने दीक्षा सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

फोटो: केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या दीक्षा संरभावेळी मुलांसोबत उपस्थित तातोबा तळकर, विठ्ठल गडेकर, व्रजेश केरकर, विनायक गाड व शिक्षक.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar