पोलीस सेवा बजावत असताना आपले कार्य अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांना भावले असावे म्हणूनच त्यांनी हणजूण पोलीस स्थानकात 

.
पोलीस सेवा बजावत असताना आपले कार्य अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया च्या पदाधिकाऱ्यांना भावले असावे म्हणूनच त्यांनी हणजूण पोलीस स्थानकात समाधान या उपक्रमावेळी येऊन आपला सन्मान केला अशी प्रतिक्रिया म्हापसाचे विभागीय उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले. यावेळी हणजूण पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई उपस्थित होते.
         अँटी करप्शन ब्युरो ऑफ इंडिया चे नॅशनल ऍडव्हायझर प्रशांत बोर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष संजय विरनोडकर, कारवार अध्यक्ष संदीप गजिनकर, उत्तर गोवा जिल्हा सचिव विभा शेट, उत्तर गोवा वरिष्ठ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनीता हांडा, उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष अभिषेक नाईक, उत्तर गोवा जिल्हा सहसंयोजक मंदा गोवेकर यांनी हणजूण पोलीस स्थानकात येऊन उपअधीक्षक जिवबा दळवी यांना प्रशास्तिपत्र देऊन सन्मान केला.
      असे सन्मान किंवा पुरस्कार मिळाल्याने चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळते, आपल्या कार्यकाळात पोलीस स्थानकात येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यास आपण कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सुचने नुसार गुन्हे घडू नयेत म्हणून जनतेत जनजागृती करण्याची गरज आहे. लोकांनीही सहकार्य करून बाहेरील लोकांचे टेंनंट फॉर्म भरून पोलीस स्थानकात सादर करावे. आपण नेहमीच वेगळ्या पद्धतीने आपले काम करतो ते लोकांना आवडते याचे आपणास समाधान मिळते असे उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar