मुलांनी उच्च शिक्षणाच्या वाटा निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा : नारायण सोपटे केरकर

.

मुलांनी उच्च शिक्षणाच्या वाटा निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा : नारायण सोपटे केरकर

हरमल प्रतिनिधी

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यानी आपल्या उच्च शिक्षणाच्या वाटा निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा. भविष्यात आपले करियर घडवण्यासाठी कोणते शिक्षण आपणास उपयुक्त ठरणार याचा चोखंदळपणे आत्ताच विचार करायला हवा. आपले मित्र किंवा मैत्रिणी एखाद्या शाखेत जातात म्हणून आपणही तिथे जाऊ नये . आपले भविष्य, आपल्या आवडी निवडी यांचा विचार आपण स्वतः केला पाहिजे. तेव्हाच आपल्या भविष्याला यथोचित आकार मिळणार. असे प्रतिपादन केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुल व्यवस्थापनाचे चेअरमन नारायण सोपटे केरकर यांनी केरी येथे केले.

गोवा शालांत मंडळाने यावर्षी घेतलेल्या दहावी परीक्षेत शाळेतील यशवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमानिमित्त सोपटे केरकर केरी येथे उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोब शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, गुरुप्रसाद तांडेल, यशवंत पेडणेकर व अन्य शिक्षक उपस्थित होते.

यावेळी दहावी बोर्ड परीक्षेत शाळेतून प्रथम आलेली आणि शाळेतर्फे एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती पटकावलेली विद्यार्थिनी साक्षी गावडे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे केरकर यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी सकाळी शाळेचे व्यवस्थापक तातोबा तळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधला . शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या टिप्पस दिल्या.

 

फोटो

केरी पेडणे येथे न्यू इंग्लिश हायस्कुलच्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत संस्थेचे चेअरमन नारायण सोपटे केरकर ,मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर व शिक्षकवर्ग

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar