भारतात क्‍यूएसआर उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच, केएफसीकडून सर्वात शाश्‍वत

.

भारतात क्‍यूएसआर उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच, केएफसीकडून सर्वात शाश्‍वत रेस्‍टॉरंट’केएफसीकॉन्शियस'(KFConscious) लॉन्च निसर्गावर अधिक सकारात्‍मक परिणाम निर्माण करण्‍याचा मनसुबा; २०२२ पर्यंत असे आणखी २० रेस्‍टॉरंट्स सुरू करण्‍याची योजना

जून ४, २०२२: शाश्‍वत सोल्‍यूशन्‍सच्‍या आणि निसर्गावर अधिक सकारात्‍मक परिणाम निर्माण करण्‍याच्‍या उद्देशासह केएफसी इंडियाने केएफसीकॉन्शियसची (KFConscious) घोषणा केली आहे. भारतात क्‍यूएसआर उद्योगामध्‍ये पहिल्‍यांदाच, ब्रॅण्‍डने पर्यावरणाप्रती उत्तम सेवक असण्‍यासोबत शाश्‍वतपूर्णरित्‍या विकसित होण्‍याच्‍या ब्रॅण्‍डच्‍या कटिबद्धतेमधील प्रतीक म्‍हणून टी एन नगर, चेन्‍नई येथे त्‍यांचे सर्वात शाश्‍वत रेस्‍टॉरंट लॉन्च केले. रेस्‍टॉरंटची डिझाइन व कार्यसंचालनांमंध्‍ये ऊर्जा कार्यक्षमता, विश्‍वासार्ह साहित्‍याचा वापर आणि अपव्‍यय होणा-या पाण्‍याचा (वेस्‍ट वॉटर) समावेश आहे. हे लॉन्च ब्रॅण्‍डच्‍या सतत असणा-या प्रयत्‍नांमधील आणखी एक प्रयत्‍न आहे. फूड कोर्ट यमुनानगर एक्‍सप्रेसवेमधील आणखी एक केएफसी आऊटलेट ऊर्जा कार्यक्षम आहे. ब्रॅण्‍डचा २०२२ पर्यंत असे आणखी २० रेस्‍टॉरंट्स लॉन्च करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासाठी ब्रॅण्‍ड ग्राहकांना अधिक जबाबदारीने त्‍यांच्‍या आवडत्‍या केएफसी खाद्यपदार्थांचा आस्‍वाद घेण्‍यास सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

आपल्‍या निसर्गाच्‍या शाश्‍वतपूर्ण व्‍यवहारासाठी परिवर्तनाला चालना देण्‍याबाबत बोलताना केएफसी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्‍टर समिर मेनन म्‍हणाले, ”आम्ही अधिक उद्देशपूर्ण भविष्य घडवण्यास उत्‍सुक आहोत आणि आमचे ग्राहक, समुदाय व पर्यावरणासाठी उत्तम भविष्य निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

केएफसीकॉन्शियसने (KFConscious) रेस्टॉरंट उद्योगात अर्थपूर्ण बदल आणि अग्रेसर शाश्‍वत विकास करण्याच्या आमच्या प्रयत्‍नांना चालना दिली आहे. भारतातील अग्रगण्य क्‍यूएसआर ब्रॅण्‍ड असल्‍याने आम्हाला शाश्‍वततेबाबत जागरूकता निर्माण करण्‍यास मदत करण्‍याकरिता मिळालेल्‍या संधीबद्दल सन्‍माननीय वाटते आणि भावी परिवर्तनाबाबत मार्गदर्शन करण्‍याचा अभिमान वाटतो.”

केएफसीकॉन्शियसच्‍या (KFConscious) माध्‍यमातून केले जाणारे प्रयत्‍न २०३० पर्यंत ग्रीनहाऊस गॅस उत्‍सर्जन ४६ टक्‍क्‍यांनी कमी करण्‍याच्‍या केएफसीच्‍या जागतिक कटिबद्धतेशी संलग्‍न आहेत. तसेच २०२५ पर्यंत सर्व प्‍लास्टिक-आधारित, ग्राहक-केंद्रित पॅकेजिंग रिकव्‍हरेबल किंवा पुनर्वापर करण्‍यायोग्‍य बनवण्‍याची कटिबद्धता आहे आणि केएफसीकॉन्शियस (KFConscious) ह्या कटिबद्धतेमध्‍ये आणखी एक भर आहे. दर सहा तासांनी कुठे-ना-कुठे नवीन केएफसी रेस्‍टॉरंट सुरू होत असल्‍याने ब्रॅण्‍डने स्थिरपणे विकसित होण्‍याची जबाबदारी घेतली आहे, अशा री‍तीने की, जगभरातील केएफसी चाहते आगामी अनेक वर्षांसाठी जगातील सर्वात स्‍वादिष्‍ट चिकनचा आस्‍वाद घेऊ शकतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar