ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने शिवलिंग आढळल्याचा भाग प्रतिबंधित करण्याची अनुमती

.

गोव्यातील मंदिर विश्वस्तांच्या वतीने ‘ज्ञानवापी’ मुक्तीसाठी लढणारे
अधिवक्ता हरि शंकर जैन व विष्णु शंकर जैन यांचा सत्कार !

श्री काशी विश्वनाथ मंदिरासाठी यशस्वीपणे न्यायालयीन संघर्ष करणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता हरि शंकर जैन आणि ‘हिंदू फ्रंट फॉर जस्टिस’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. विष्णु शंकर जैन यांचा गोव्यातील विविध देवस्थानांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा येथे आयोजित दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हा सन्मान समारोह भावपूर्ण वातावरणात झाला. या वेळी गोव्यातील मंदिर विश्वस्तांनी जैन पिता-पुत्रांना पुष्पहार घालून, तसेच शाल, श्रीफळ आणि देवतांची प्रतिमा देऊन जाहीर सत्कार केला.

या प्रसंगी ‘श्री मंगेश देवस्थान’चे अध्यक्ष डॉ. अजय कंटक आणि सचिव श्री. अरुण नाडकर्णी, कोरगाव-पेडणे येथील श्री कमळेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ प्रभु आणि सचिव श्री. कृष्ण गावडे, जांबावली येथील ‘श्री रामनाथ दामोदर देवस्थान’चे खजिनदार श्री. जयेश कामत-बांबोळकर, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे अध्यक्ष श्री. चंद्रकांत(भाई) पंडित आणि सचिव श्री. जयेश थळी उपस्थित होते. या वेळी गोवा राज्य आणि उत्तर प्रदेश राज्य यांचा विशेष संबंध सांगतांना श्री मंगेश देवस्थानाचे डॉ. अजय कंटक म्हणाले, ‘‘काशी येथील श्री विश्वनाथ मंदिरात पूजेचा पहिला मान श्री मंगेश देवस्थानच्या महाजनांचा आहे. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री उत्सवाप्रसंगी काशी येथील विश्वनाथ मंदिरातून गोव्यातील श्री मंगेश देवस्थानात गंगाजल पाठवण्यात येते, त्या जलाद्वारे महाशिवरात्रीनंतर देवस्थानच्या गर्भगृहाची शुद्धी केली जाते.’’

तो दिवस दूर नाही, जेव्हा हिंदू एकत्रितपणे श्री काशी विश्वनाथाची पूजा करतील ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वाेच्च न्यायालय

ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयाने शिवलिंग आढळल्याचा भाग प्रतिबंधित करण्याची अनुमती दिली. तेथे आणखी बरीच हिंदूंची प्रतिके, चिन्हे सापडली आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा हिंदु एकत्रित येऊन काशी विश्वनाथ मंदिरात श्री विश्वनाथाचे पूजन करतील, असा दृढविश्वास ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे राष्ट्रीय प्रवक्ते सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णुशंकर जैन यांनी व्यक्त केला. ते अधिवेशनाच्या उद्बोधन सत्रात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ची भीषणता आणि काशी-मथुरा मुक्ती आंदोलन’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता हरि शंकर जैन, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता अमृतेश एन्.पी. आणि ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. एम्. नागेश्वर राव हे उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar