मांद्रे पाट्याचे बाग नदीकिनारी बेकायदा बांधकाम ‘स्वराज’ संस्थेने पंचायतीचे वेधले लक्ष; कारवाईची मागणी

.

मांद्रे पाट्याचे बाग नदीकिनारी बेकायदा बांधकाम
‘स्वराज’ संस्थेने पंचायतीचे वेधले लक्ष; कारवाईची मागणी

मांद्रे :
मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाट्याचे बाग मधलामाज परिसरात नदीकिनारी बेकायदा बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला पंचायतीने त्वरित ‘काम बंद’चा आदेश द्यावा आणि पाहणी करून मालकावर कारवाई करावी, अशी मागणी ‘स्वराज’ संस्थेने केली आहे.
‘स्वराज’ संस्थेचे अध्यक्ष अॅड. किशोर शेटमांद्रेकर आणि कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ पार्सेकर यांच्यासह शिष्टमंडळाने आज (मंगळवारी ) सरपंच सौ. प्रिया महेश कोनाडकर आणि सचिव श्री. अमित प्रभू यांची भेट घेऊन मधलामाज येथे बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. माद्रे नदीकिनारी तसेच पाटो पुलाला खेटूनच प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे. नदीकिनार्‍यालगत पाया उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या बेकायदा बांधकामामुळे पर्यावरणाचा -हास होणार आहे. शिवाय पुलाला धोका निर्माण झाला आहे. सीआरझेडसह सर्व नियमांचे उल्लंघन करून चाललेल्या या बांधकामाला स्थागती द्यावी आणि तिथे पाहणी करून कारवाई करावी, असे लेखी निवेदनही ‘स्वराज’च्यावतीने सादर करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती उपजिल्हाधिकारी पेडणे, मामलेदार, गटविकास अधिकारी यांनाही सादर करण्यात आल्या असून बेकायदा बांधकामावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच बांधकामाची छायाचित्रेही निवेदनासोबत दिली आहेत.
सरपंच प्रिया कोनाडकर आणि सचिव अमित प्रभू यांनी या प्रकरणी त्वरित पावले उचलली जातील, असे अश्वासन ‘स्वराज’च्या शिष्टमंडळाला दिले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar