मंदिरांना ‘मॉल’ आणि तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे

.
मंदिरांना ‘मॉल’ आणि तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका, अशी मागणी !  

      प्राचीन काळी अंगकोर वाटहम्पीआदी ठिकाणी भव्य मंदिरे उभी करणार्‍या राजेमहाराजांनी त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले होतेया मंदिरांच्या माध्यमातून गोशाळाअन्नछत्रधर्मशाळाशिक्षणकेंद्र चालवून समाजाला मोलाचे साहाय्य केले जात होतेयामुळेच मंदिरांशी हिंदु समाज जोडलेला असेआता मात्र मंदिरांचे इतके व्यापारीकरण झाले आहे कीते (शॉपिंग) ‘मॉल’ होऊ लागले आहेततसेच तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहेहे रोखणे आवश्यक आहेत्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनीतसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजेहे साध्य करण्यासाठी ‘मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ (दी टेम्पल मॅनेजमेंटहा अभ्यासक्रम चालू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत करण्यात आलीदशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ याविषयावरील हिंदु राष्ट्र संसदेत विविध मंदिरांचे विश्वस्तभक्तअधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केलेया संसदेत सभापती म्हणून ओडिशा येथील श्रीअनिल धीरउपसभापती म्हणून हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पूनीलेश सिंगबाळतसेच सचिव म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्रीआनंद जाखोटिया यांनी कामकाज पाहिले.

       अडीच तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत ‘हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत’,  ‘मंदिरात तेथील कामकाजासाठी केवळ हिंदूंचीच नियुक्ती करण्यात यावी’, ‘मंदिर परिसरात मद्यमांस यांना बंदी असावीतसेच अन्य धर्मियांच्या प्रसारास बंदी असावी’असे प्रस्ताव संमत करण्यात आलेयाला ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या गजरात उपस्थित धर्मनिष्ठांनी अनुमोदन दिले.  

      प्रारंभी विषय मांडतांना उपसभापती पूसिंगबाळ म्हणाले, ‘‘आज सरकारीकरण झालेल्या प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतोत्याचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मंदिरांचे सुव्यवस्थापन होणे फार महत्त्वाचे आहे.’’ अमरावती येथील ‘रामप्रिया फाऊंडेशन’च्या अध्यक्षा रामप्रियाश्री (माईअवघड म्हणाल्या, ‘‘भारत देशाचा इतिहास युवकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहेत्यासाठी लहान मुलांनातरुणांना मंदिरांशी जोडण्याची आवश्यकता आहे.’’ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मत मांडले कीगोव्यात ज्याप्रकारे मंदिरांनी आदर्श वस्त्रसंहिता लागू केली आहेत्याचप्रकारे देशभरातील मंदिरांमध्येही ती लागू करणे आवश्यक आहेया वेळी अमळनेर (जळगावयेथील मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीशरद कुलकर्णीचांदूरबाजार (अमरावतीयेथील ‘गजानन महाराज सेवा समिती’चे ह..मदन तिरमारेनांदेड येथील ‘श्री संत पाचलेगावकर मुक्तेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्रीसुधाकर टाक यांनी ते मंदिरांचे व्यवस्थापन कशाप्रकारे करतातते सांगितलेया अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण HinduJagruti या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें