हरमलपंचायत क्षेत्रांतील खालचावाडा,मधलावाडा व अन्य क्षेत्रांत मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर

.
हरमलपंचायत क्षेत्रांतील खालचावाडा,मधलावाडा व अन्य क्षेत्रांत मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर पुरस्कृत टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे,भर पावसाळ्यात नळाला पाणी येत नसल्याचा टाहो ग्रामस्थ भगिनींचा असून येत्या चार दिवसांत पाणी सुरळीत न केल्यास घागर मोर्चा नेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान पाणी पुरवठा खात्याच्या कर्मचाऱ्यात अनियमितपणा वाढला असून त्यांना नेमकी फूस कोणाची हे कळणे कठीण आहे.त्यामुळे पाणी पुरवठा नियांत्रिय अनियमित कर्मचाऱ्यांची त्वरित बदली करण्याची मागणी जोर धरीत आहे.
सध्या कित्येक भागांत आमदार जित आरोलकर यांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा चालूच ठेवला आहे, निवडून येण्यापूर्वीही ही सेवा सुरू होती,व  अद्यापही चालू आहे.हरमल भागातील नागरिकांची पाण्याची तहान आमदार आरोलकर पुरवीत असलेल्या पाण्यावर निभावत असल्याने नागरिक समाधानी आहेत,मात्र सरकारी नळ पावसाळ्यात सुद्धा कोरडे राहण्याची कारणे काय,अन्यथा ते नळ वापस न्यावेत अशी अपेक्षा खात्याच्या अधिकारीवर्गाची आहे का,असा सवाल गृहिणी सारिका हरमलकर यांनी केला आहे.
पाण्याची नियमित बिले भरूनही सरकार अपयशी ठरत असल्यास 24 तासांची घोषणा नकोच,मात्र किमान तासभर तरी पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केले आहे.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी निवडून आल्यानंतर गेल्याच महिन्यात बैठक घेतली होती.मात्र खात्याचे अधिकारी प्रत्यक्षात कार्य करीत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्या बैठकीपासून पाणी टंचाई प्रखरपणे भेडसावत आहे.नळाचे पाणीच बंद होण्याची कारणे शोधून काढणे गरजेचे असून अधिकारी केवळ आमदारांची दिशाभूल करून खुर्चीला चिकटून आहेत,असे हरमलकर यांनी नाराजीच्या सुरात सांगितले.
कर्मचाऱ्यांकडून आमदार व अधिकाऱ्याची दिशाभूल—-
पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी अनियमितपणे ड्युटीवर असतात,मात्र मुबलक पाणी पुरवठा नियंत्रित करण्याकामी अपयशी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.ज्या वाड्यावर पाणी टंचाई आहे,त्या भागातील नागरिकांना जादा वेळ पाणी पुरवठा करणे उचित असते,मात्र कर्मचारी अपुरा पाणी पुरवठा असल्याचे खोटे कारण देऊन लोकांना तिष्ठत ठेवतात व ज्या वाड्यावरील लोकांना मुबलक पाणी असते त्या भागात पाणी वळवून आमदार व अधिकाऱ्यांची दिशाभुल करतात, असा आरोप गृहिणींनी केला आहे.
सह्ययक अभियंत्यांची बदलीची मागणी—
अलीकडे सह्ययक अभियंता गौरेश ठाकूर कामचुकारपणा करीत असून नागरिकांच्या तक्रारी ची दखल घेत नाही.हरमल पंचायत क्षेत्रातील पाणी पुरवठ्याची इत्यंभूत माहिती असूनही ते कार्यवाही करीत नसल्याने त्यांची बदली करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
आमदारांनी कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट कार्ड करावे–
पाणीपुरवठा खात्याचे उच्च पदस्थ अधिकारी बैठकीत आमदार जित आरोलकर यांची दिशाभूलकारक उत्तरे देऊन बोळवण करतात.मात्र  जनतेला उत्तर देताना आमदार आरोलकर याना सत्यस्थिती कळून येते.कर्मचारी नेहमीच अपुरा पाणी पुरवठा असल्याचे कारण सांगतात, तर टँकरचे पाणी चार दिवसांनीच होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.टँकरचालक केवळ दोन-तीन लहान बॅरल भरून देत असतो,तेवढे पाणी चार दिवस पुरेसे असते का,असा सवाल नागरिक विशांत पेडणेकर यांनी केला आहे.टँकरच्या कार्यपद्धतीची माहिती आमदार आरोलकर यांनी जाणून घ्यावी अशी मागणी केली आहे.
पंचसदस्य तथा मगो गट समिती अध्यक्ष प्रविण वायंगणकर यांच्याशी संपर्क केला असता,टँकरचे पाणी नागरिक व टंचाईग्रस्त भागाला दिले जाते,मात्र टँकरच्याबाबतीत रिपोर्ट तयार केला पाहिजे,त्यांची बिले व अन्य बाबतीत अहवाल घ्यायला पाहिजे,असे वायंगणकर यानी सांगितले.सध्या जनतेत पाणी व वीज प्रश्नावरून प्रचंड खदखद असून आमदार जित आरोलकर यांनी अधिकाऱ्यांची परेड घेतली पाहिजे,असे मत नागरिक व्यक्त करतात.
पूर्णवेळ अभियंत्यांची नेमणूक आवश्यक—-
पाणी पुरवठा खात्याकडे पूर्णवेळ अभियंता नसल्याने लोकांची आबाळ होत आहे.दोन तालुक्यासाठी एकच अधिकारी आहे,हा सरळसरळ अन्याय आहे.सदर अधिकारी कसले काम व किती दिवस करणार,हा सवाल आहे.पाणीपुरवठा खाते नेहमीच जनतेला गृहीत धरून कार्य करीत असून त्यांचा विस्फोट होण्याची वेळ ठेपली असून येत्या 20 जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास घागर मोर्चा काढला जाईल, त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल असे मत नागरिक अद्रियन डिसौझा यांनी व्यक्त केले.
तरी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर यांनी पाणीप्रश्नी लक्ष घालून ग्रामस्थ,गृहिणींना दिलासा द्यावा व अधिकार्यांना तंबी द्यावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar