पतंजली योग समिती , बारदेझ यांच्यातर्फे आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्राचे

.

पतंजली योग समिती , बारदेझ यांच्यातर्फे आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 21 जून 2022 रोजी संध्याकाळी सहा ते साडेसात यादरम्यान ,(6.00pm to 7.30 pm ) इनडोअर स्टेडियम पेडे- म्हापसा इथे हा कार्यक्रम संपन्न होणार. जॉगर्स सोशल असोसिएशन व इतर सामाजिक व सांस्कृतिक संघटना या कार्यक्रमात सहभाग घेतील. योग प्रेमींनी सहपरिवार या विशेष योग सत्रात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. भारत स्वाभिमान चे गोवा राज्य प्रभारी आदरणीय श्री कमलेशजी बांदेकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील. तसेच तालुका पातळीवर मध्यवर्ती कार्यक्रम असल्याने बारदेझ तालुक्यातील सर्व मंत्री व आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे . म्हापसा नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवकांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे बारदेझ पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री अशोक साळगावकर यांनी पत्रकाद्वारे द्वारे कळविले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar