शांता विद्यालयात क्रांतीदिन उत्साहात

.

श्री.शांता विद्यालयात क्रांतीदिन उत्साहात

 

“१८जून हा क्रांती दिवस म्हणजे अतर्क्य व स्फूर्तिदायी दिवस ज्या दिवशी गोमंतकीयांच्या मनामध्ये पोर्तुगिजांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची क्रांतीची ज्योत पेटली .आजच्या काळात चालू असलेल्या तत्सम गोष्टींना नष्ट करण्यासाठी आपल्या विचारांमध्ये व आचरणामध्ये क्रांती आणूया” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्री. सचिन मदगे यांनी केले

विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री शांता विद्यालयामध्ये अठरा जून क्रांती दिन साजरा करण्यात आला यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते .यावेळी शाळेचे व्यवस्थापक श्री. शिवाजी पाटील, मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगाळे ,शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीगण उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. प्रजिता सांगाळे यांनी प्रमुख पाहुण्यांच्या कार्यकृत्याचा परिचय करून दिला व शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्फूर्ती गीत सादर केले. क्रांती दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थिनी कुमारी सुहाना शहा व कुमारी तस्मीया तंदूर यांनी क्रांती दिनाचे महत्व विषद केले.तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गोमंतकीय क्रांतीकारक या विषयावर तयार केलेले भिंक्ति पत्रकाचे अनावरण प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचप्रमाणे प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.तसेच विद्यार्थींनी कु.लविशा लंगोटे व कुमारी समीक्षा परब यांनी थोर गोमंतकीय क्रांतिकारक या विषयावर वेशभूषा सादर केली. तसेच विद्यार्थिनी कुमारी शर्वानी पेडणेकर यांनी क्रांतिकारकांना समर्पित कोकणी कविता सादर केली तसेच विद्यार्थी कुमार अभंग रागजी व कुमारी मनुश्री गोल्तेकर यांनी गोवा क्रांती दिन या विषयावर भाष्य केले.
शिक्षक श्री विश्वास सांगाळे व शिक्षिका रक्षंदा आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी रिद्धी गोल्तेकर यांनी केले व आभार प्रदर्शन विद्यार्थ्यांनी कु.मुस्कान मंथगी यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar