अमेझॉनतर्फे लोकल स्टोअर्सचे डिजिटल दुकानांमध्ये रूपांतर करण्यासाठी स्मार्ट कॉमर्स लॉन्च
लोकल दुकानांचे डिजिटल दुकानांमध्ये रूपांतर करण्यासाठी तसेच २०२५ पर्यंत १ कोटी लघु व्यवसाय डिजिटल करण्याच्या आपल्या निश्चियाला गती देण्यासाठी अमेझॉन इंडियाने स्मार्ट कॉमर्स लाँच केल्याची घोषणा केली. अमेझॉन संभवच्या प्रमुख वार्षिक शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली.सध्या १. ५ लाखांहून अधिक दुकाने अमेझॉन डाँट इन (Amazon.in) वापरून आधीच ऑनलाइन विक्री करीत आहेत. स्मार्ट कॉमर्समुळे व्यावसायिक त्यांच्या व्यावसायात आता आणखी पुढे जाऊ शकतात. तसेच त्यांच्या ऑफलाइन कामकाजाचे डिजिटायझेशन देखील करू शकणार आहेत. तर दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या खरेदीत वाढ करीत त्यांना स्टोअरमधील खरेदीचा अनुभव देऊ शकता येईल .
ग्राहकांना थेट सेवा देण्यासाठी व्यवसायिक त्यांचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअरफ्रंट तयार करू शकतील. अमेझॉनच्या सर्वोत्तम खरेदी नवकल्पना, लॉजिस्टिक्स, डिजिटल पेमेंट्स आणि अधिकचा लाभ कोणत्याही आकाराचे दुकान आता घेऊ शकतात. त्यामुळे ग्राहक कोठेही असले तरी त्यांना विश्वसनीय आणि विश्वासार्ह अनुभव मिळतील. त्यासाठी ते प्रत्यक्ष दुकानात असतील किंवा ऑनलाइन स्टोअरफ्रंटद्वारे अमेझॉन डाँट इनवर याचा फरक पडणार नाही.
लोकल स्टोअर्सना बिलिंग आणि यादीचे व्यवस्थापन डिजिटायझ करण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांच्या ग्राहकांना स्टोअरमधील अधिक चांगला अनुभव देण्यासाठी स्मार्ट कॉमर्स येत्या आठवड्यात उपायांची माहिती असलेला सेट जारी करेल. त्यानंतर काही मिनिटांत त्यांचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअरफ्रंट तयार करण्यास आणि ग्राहकांना सोप्या आवाजाद्वारे आणि चॅट-आधारित खरेदी अनुभवाद्वारे सेवा देण्यास सक्षम करेल.
अमेझॉनच्या भारत आणि इमर्जिंग मार्केट्सचे वरीष्ठ उपाध्यक्ष अमित अग्रवाल म्हणाले की, “भारतातील स्टोअर्स ऑनलाइन जाण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आमच्या अमेझॉन प्रोग्रामचा फायदा घेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.१.५ लाखांहून अधिक स्टोअर्स आधीच अमेझॉन सुरू झाल्यानंतर दोन वर्षांत विक्री करीत आहेत. आज, आम्ही स्मार्ट कॉमर्स लाँच करण्यास उत्सुक आहोत जे कोणत्याही स्टोअरला खऱ्या अर्थाने डिजिटल दुकान बनण्यास सक्षम करेल. ग्राहक कोठेही असोत ते भौतिक स्टोअरमध्ये, त्यांच्या स्वत: च्या ऑनलाइन स्टोअरफ्रंटद्वारे किंवा अमेझॉन वर खरेदी करू शकता. आम्ही नुकतीच सुरुवात करीत आहोत आणि २०२५ पर्यंत एक कोटी लघु व्यवसाय डिजिटल करण्याच्या आमच्या वचनाला वचनबद्ध करीत आहोत.”