वाताहार पालये ( पेडणे) पंचायत क्षेत्रात काही ठराविक वाडयावर सरकारी निधीचा गैरवापर झाल्या चे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला असतानाच आणि पंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात आला असतानाच घाईघाईत ही कामे पूर्ण केली जात आहेत. प्रभागात कुणाच्या अंगणाला तर कुणाच्या फुटपाथवर चक्क टाईल्स बसवून ही कामे पावसाळ्यात पूर्ण केली जात आहेत
कार्यकाळ संपत असतानाच घाईगडबडीत आणि अर्थपूर्ण संमतीने ही कामे मंजूर करून घेण्यात आली तर सुरू असलेल्या कामाचा पावसामुळे बोजवारा उडाला आहे
प्रभागातील मतदारांना खूष करण्यासाठी काही र्ठराविक प्रभागात ही कामे केली जात असून येणाऱ्या पंचायतीच्या निवडणूकीपुवी मतदाराना खुष केले जात आहे. सरपंच, पंच आम्ही किती कामे करवून घेतली याची यादी सर्वांसमोर ठेवण्यासाठी हा खटाटोप चालला असून सरकारी पैशाचा गैरवापर केला जात आहे. निकृष्ट दर्जाची कामे करण्यापेक्षा ती ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये पूर्ण करावी अशी जनतेची मागणी आहे
गटविकास अधिकारी नी यात लक्ष घालून सरकारी निधीचा गैरवापर टाळावा अशी मागणी जनता करीत आहे.