वेर्ला-काणका साईमंदिराच्या अध्यक्षपदी प्रदीप नार्वेकर म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी) :

.

वेर्ला-काणका साईमंदिराच्या अध्यक्षपदी प्रदीप नार्वेकर

म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी) :

वेर्ला-काणका येथील श्री साई सेवाधाम या मंदिराच्या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रदीप नार्वेकर यांची निवड झाली आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या या कार्यकारिणीचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्ष : प्रीतमराज गावकर, सचिव : परेश पालयेकर, सहसचिव : वासुदेव कोरगावकर, खजिनदार : आनंद कांदोळकर, उपखजिनदार : महेश कोरगावकर, सदस्य : संजय पिळणकर, सागर आरोलकर, तुळशीदास शिरगावकर, उल्हास चिबडे, उमाकांत धारगळकर.

रविवार २० रोजी मंदिराच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस निर्वाचन अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष बलराम गावकर, आनंद कांदोळकर, लक्ष्मण ऊर्फ बाबा कोरगावकर व ॲड. महेश शेटगावकर उपस्थित होते.

या बैठकीत गतवर्षीच्या जमाखर्चास तसेच पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकासही मंजुरी देण्यात आली. ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 

(फोटो कॅप्शन) :

वेर्ला-काणका येथील साईमंदिराच्या कार्यकारिणीवर निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप नार्वेकर व इतर पदाधिकारी.

………….

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें