कृष्णा आजगावकर संगीत संमेलन यंदा ३ जुलै रोजी

.

कृष्णा आजगावकर संगीत संमेलन यंदा ३ जुलै रोजी

म्हापसा, दि. २३ (प्रतिनिधी) :

मास्टर कृष्णा भिकू आजगावकर स्मृती विसावे संगीत संमेलन खोर्ली-म्हापसा येथील श्री सातेरी सभागृहात रविवार ३ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष शेखर नागडे यांनी दिली.

या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात खोर्ली येथे भिकू आजगावकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस शेखर नागडे, प्रेमानंद शेट-वेलिंगकर, उदेश कारेकर, श्यामसुंदर कारेकर, आनंद मोरजकर, विनायक चिबडे, देवीदास कारेकर, प्रणव शेट-वेलिंगकर व भिकू आजगावकर यांची उपस्थिती होती.

संमेलनाच्‍या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याची जबाबदारी काही कलाकार मंडळीवर सोपवण्यात आली आहे. गतवर्षी निधन झालेल्या कलाकारांच्या कार्याचे संमेलनात स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. त्यामध्ये गानकोकिळा पद्मश्री लता मंगेशकर, प्रभाकर केरकर, मनोहर मांद्रेकर, डॉ. रामकृष्ण मोरजकर, नाट्यकलाकार पांडुरंग कोरगावकर व इतर कलाकारांचा समावेश आहे, असे यासंदर्भात बोलताना शेखर नागडे यांनी स्पष्ट केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar