केटीएमकडून मॅप्सुआमध्‍ये अॅडवेन्‍चर ट्रेलचे आयोजन

.

केटीएमकडून मॅप्सुआमध्‍ये अॅडवेन्‍चर ट्रेलचे आयोजन
एकदिवसीय साहसी राइड्समध्‍ये केटीएम एक्‍स्‍पर्टसने क्‍यूरेट केलेले व ने‍तृत्वित रोमांचक ट्रेल्‍सचा शोध
24 जून 2022: केटीएम या जगातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या आणि भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या प्रिमिअम मोटरसायकल ब्रॅण्‍डने 19 जून 2022 रोजी सकाळी मॅप्सुआमध्‍ये केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेल्‍सचे आयोजन केले.
केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेल्‍सचा केटीएम मालकांना एक-दिवसीय राइड्सच्या माध्‍यमातून साहसी बाइकिंगची ओळख करून देण्‍याचा मनसुबा आहे आणि ते या रोमांचक ट्रेल्‍सचा अनुभव घेऊ शकतात. केटीएम एक्‍स्‍पर्टसनी सर्वांगीण राइड अनुभव देण्‍यासाठी आणि सर्व प्रकारच्‍या प्रदेशांना पार करण्‍याकरिता मुलभूत राइडिंग टेक्निकबाबत माहिती देण्‍यासाठी हे साहसी ट्रेल्‍स काळजीपूर्वक निवडले व तयार केले आहेत. अॅडवेन्‍चर ट्रेल्‍स अशा पद्धतीने तयार करण्‍यात आले आहेत की, राइडर्स त्‍यांच्‍या शहरांच्‍या आसपासचे छुपे मार्ग शोधू शकतात. हे राइड्स केटीएम मालकांना ऑन-रोड व ऑफ-रोडवरील त्‍यांच्‍या बाइक्‍सच्‍या क्षमता व त्‍यांची वैविध्‍यता समजण्‍यास देखील मदत करतात. केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेल्‍स विशेषत: केटीएम अॅडवेन्‍चर मालकांसाठी आयोजित करण्‍यात आले आहेत आणि नोंदणी करण्‍याची इच्‍छा असलेले ग्राहक वेळापत्रकानुसार त्‍यांच्‍या संबंधित डिलरशिप्‍सशी संपर्क साधू शकतात.
केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेल्‍स परिपूर्ण मल्‍टी-टेरेन स्‍पेशालिस्‍ट्स असलेल्‍या केटीएम एक्‍स्‍पर्टसद्वारे नेतृत्वित आहेत. ते या प्रॉपर्टीसाठी मार्गदर्शक स्रोत आहेत आणि विभिन्‍न कौशल्‍ये असलेले राइडर्स यशस्‍वीरित्‍या ट्रेल्‍स पूर्ण करू शकण्‍याच्‍या खात्रीसाठी विशेष काळजी घेतात. केटीएम एक्‍स्‍पर्ट राइडर बिग रॉक डर्ट पार्क संघ यांनी मॅप्सुआमधील अॅडवेन्‍चर ट्रेलचे नेतृत्‍व केले. हे अॅडवेन्‍चर ट्रेल केटीएम मॅप्सुआ, होऊन आमठाणे धरण येथे समाप्‍त झाले. दिवसा राइडदरम्‍यान मालकांना व्हिजन, बॉडी कंट्रोल, बाइक कंट्रोल्‍स अशा आवश्‍यक महत्त्वाच्‍या ऑफ-रोडिंग क्षमतांवर लक्ष केंद्रित करणा-या प्रत्‍यक्ष सत्राचा अनुभव घेण्‍याची संधी मिळाली. ट्रेलदरम्‍यान एमटीसी, ऑफ-रोड एबीएस, कॉर्नरिंग एबीएस, क्विक शिफ्टर+ इत्‍यादी सारख्‍या अॅडवेन्‍चर बाइक्‍समधील तंत्रज्ञान वैशिष्‍ट्यांचे स्‍पष्‍टीकरण व प्रात्‍यक्षिक माहितीपूर्ण व धमाल राइडिंगचे परिपूर्ण संयोजन देतात.
याप्रसंगी बोलताना बजाज ऑटो लि. येथील अध्‍यक्ष (प्रोबाइकिंग) सुमीत नारंग म्‍हणाले, ”केटीएम ब्रॅण्‍ड म्‍हणून नेहमीच ग्राहकांना विभागामध्‍ये उपलब्‍ध सर्वोत्तम बाइक्‍स देत आली आहे. मला सांगताना आनंद होत आहे की आतापर्यंत आम्‍ही १०,००० हून अधिक केटीएम मालकांना प्रोत्‍साहित केले आहे, ज्‍यांनी विविध केटीएम प्रो-एक्‍सपी अॅक्टिव्‍हीटीजमध्‍ये सहभाग घेतला आहे. अॅडवेन्‍चर ट्रेल्‍स आणि इतर प्रो-एक्‍सपी प्रॉपर्टीजच्‍या भरसह आम्‍ही ग्राहकांना साहसी राइडिंग व मोटरबाइकबाबत सर्व आवश्‍यक माहिती देत सर्वोत्तम राइडर बनवण्‍याप्रती आणखी एक पाऊल उचलले आहे. मॅप्सुआमधील केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेलच्‍या यशासह आम्‍ही इतर शहरांमध्‍ये अशा प्रकारच्‍या राइड्सचे आयोजन करण्‍याची आणि देशभरात केटीएम प्रो-एक्‍सपी समुदायाची निर्मिती करण्‍याची योजना आखली आहे.”
पुढील काही महिन्‍यांमध्‍ये देशभरातील अव्‍वल शहरांत केटीएम अॅडवेन्‍चर ट्रेल नियमितपणे आयोजित करण्‍यात येईल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar