पतंजली योग समिती बादैश व जोगर सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापसा पेडे

.
पतंजली योग समिती बादैश व जोगर सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने म्हापसा पेडे येथील इनडोअर  सभागृहात योगदीन साजरा करण्यात आला.
यावेळी पतंजली गोवा अध्यक्ष कमलेश बांदेकर, पशुसंवर्धन खाते मंत्री निळकंठ हळर्णकर, म्हापसा नगराध्यक्षा शुभांगी वायगणकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, सुशांत हरमलकर, जोगर सोशल असोसिएशन चे अध्यक्ष विनायक आरोलकर, बादैश योग समीती अध्यक्ष अशोक साळगावकर, विश्वास कोरगांवकर, आदी उपस्थित होते. योग शिक्षक तुळशीदास मंगेशकर व सनी यांनी योग, प्राणायाम, आदी बिषयी प्रात्यक्षिके आदी उपस्थित योग साधकांकडून करवून घेतली. कमलेश बांदेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की गोवा हि तपोभूमी व   योगभूमी आहे असा उल्लेख करताना योगी पुरुष सत्तेवर असल्यामुळे देश टिकून आहे असे सांगितले. मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी आपली भूमी ही ऋषी मुनी ची असल्याचे सांगून सगळ्यानी रहावे असे सांगितले. यावेळी संदीप मोरजकर यांनी एक लाख झाडे लावायची असा संकल्प केला कार्यक्रम चे सुत्रसंचालन संदीप मोरजकर यांनी केले. बादैश योग समीती अध्यक्ष अशोक साळगावकर यांनी स्वागत केले तर सिद्धेश राऊत यांनी आभार मानले
. या वर्षी बादैश तालुक्यात १०८ ठिकाणी योग वर्ग घेण्यात आले व त्यात ५९७० जण सहभागी झाले होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar