विद्यार्थ्याला केवळ परिक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे  असे उद्गार पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे

.
विद्यार्थ्याला केवळ परिक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे  असे उद्गार पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे यांनी काढले.श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय पीर्णच्या पालक शिक्षक संघातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना तानावडे यानी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदैव झटणाऱ्या पालक-शिक्षक संघाचे कौतुक करून  गौरवान्वित विद्यार्थ्यांनी यापुढे देखील उच्च शिक्षण घेऊन विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री उमेश नाईक पालक-शिक्षक संघाचे खजिनदार श्री दत्ता परब ,सचिव प्राध्यापक रजनीकांत सावंत ,पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे सचिव श्री प्रकाश नाईक व पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री पंढरीनाथ फडते हे उपस्थित होते.  यावेळी  गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत उज्वल यश मिळविणाऱ्या  खालील विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
वाणिज्य शाखा-कृणाल परब 88 % प्रथम, सगुण सावळ  86% द्वितीय,  नेत्रा लांबार 79% तृतीय.
कला शाखा बाबली च्यारी  80.% प्रथम , विवेक नाईक 79%  द्वितीय , साईश परब 78% तृतीय .
विशेष श्रेणी प्राप्त विद्यार्थी
कला शाखा -नेहा नाईक 77%   रेश्मा फडते 77%  ,प्रणिता शिंदे 78%
वाणिज्य शाखा – कोमल शेट्ये78%, शुभम सुतार 75%,जगदीश हळर्णकर74%. पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष पंढरीनाथ फडते  यांनी आपल्या मनोगतातून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केल्या जाणाऱ्या उपक्रमांना पालक शिक्षक संघाचा सदैव पाठिंबा राहील याची ग्वाही दिली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रजनीकांत सावंत यांनी केले तर गौरव सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक दत्ता परब यांनी केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी  देवानंद नाईक व यशवंत साखळकर यानी विशेष परिश्रम

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar