जन जन का यही है नारा, मलेरिया मुक्त हो गाव हमारा” असा संदेश देत केरी गावात शालेय विद्यार्थ्यानी जनजागृती फेरी काढली.

.

गावात विद्यार्थ्यानी दिला मलेरिया मुक्तीचा संदेश !

” जन जन का यही है नारा, मलेरिया मुक्त हो गाव हमारा” असा संदेश देत केरी गावात शालेय विद्यार्थ्यानी जनजागृती फेरी काढली.

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये मलेरिया आणि डासांपासून होऊ शकणाऱ्या संभाव्य रोगराईविषयी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

तुये पेडणे येथील केंद्रीय इस्पितळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी
जागृती कार्यक्रम प्रमुख यशवंत पेडणेकर, सहाय्यक महिमा चारी,
इस्पितळाचे आरोग्य अधिक्षक पुंडलिक देसाई, आय सी ई अधिकारी रंजिल मोरजकर, सुमेधा , ब्रदर गौरीश शेटगावकर, यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मलेरिया विषयक जागृतीसाठी फेरी काढण्यात आली. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यानी केरी बाजारपेठेत जागृतीपर पथनाट्य सादर केले.

जागृती फेरीचा समारोप शाळेच्या सभागृहात झाला. या प्रसंगी आरोग्य अधिक्षक पुंडलिक देसाई, आय सी ई अधिकारी रंजिल मोरजकर यांनी मलेरिया , डेंगू,चिकून गुनिया सोबत डासांच्या प्रादुर्भावाने पसरणाऱ्या रोगराईविषयी जागृती केली. तसेच हा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कोणती उपाययोजना आखता येतील याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यशवंत पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर नीलम महालदार यांनी आभार मानले.

फोटो
केरी पेडणे येथे मलेरिया जनजागृती कार्यक्रमात सहभागी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यासोबत पुंडलिक देसाई, यशवंत पेडणेकर, महिमा चारी, गौरीश शेटगावकर, रंजिल मोरजकर व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar