*न्यू व्होकेशन फॉर न्यू जनरेशन* प्रकल्पाखाली केरी पेडणेत छायाचित्र प्रशिक्षण

.

*न्यू व्होकेशन फॉर न्यू जनरेशन* प्रकल्पाखाली केरी पेडणेत छायाचित्र प्रशिक्षण

*केरी न्यू इंग्लिश हायस्कुलचा अभिनव उपक्रम*

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये छायाचित्र प्रशिक्षण कार्यशाळेचे आज उदघाटन करण्यात आले. मुलांमध्ये जीवन कौशल्य विकासासाठी “न्यू व्होकेशन फॉर न्यू जनरेशन” प्रकल्पाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.

*चेन्नई येथील प्रख्यात छायाचित्रकार शिव सुब्रमण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होत आहे.* शिव सुब्रमण्यम हे गेल्या वीस वर्षांपासून तामिळ चित्रसृष्टी तसेच टिव्हीसाठी छायाचित्रकार म्हणून काम करीत आहेत. सध्या आरामबोला या वेब सिरीजच्या प्रकल्पानिमित्त ते गोव्यात आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या निवडक दहा विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा भरविली आहे. एक महिना कालावधीच्या या कार्यशाळेचा समारोप जुलैच्या शेवटच्या आठवड्यात होईल.

शालेय अभ्यासक्रमासोबत जीवनात आवश्यक ठरणारे व्यावसायिक कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे या हेतूने न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये ‘ न्यू व्होकेशन फॉर न्यू जनरेशन ‘ योजनेखाली विविध व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबन व सर्जनशीलतेचे शिक्षण देण्याचा मनोदय आहे असे या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी सांगितले.

शिक्षक गुरुप्रसाद तांडेल हे या प्रकल्पाचे प्रमुख असून भविष्यात विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांचे आयोजन केले जाईल असेही मांद्रेकर यांनी यावेळी सांगितले.

फोटो:
केरी पेडणे येथे न्यू व्होकेशन फॉर न्यू जनरेशन या प्रकल्पाअंतर्गत छायाचित्र प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तामिळ चित्रसृष्टीतील प्रख्यात छायाचित्रकार शिव सुब्रमण्यम. सोबत प्रकल्प प्रमुख गुरुप्रसाद तांडेल व भावार्थ मांद्रेकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar