कन्हैयालाल हत्येप्रमाणे गोव्यात घटना घडू नये म्हणून सरकारने वेळीच सावध व्हावे !

.

कन्हैयालाल हत्येप्रमाणे गोव्यात घटना घडू नये म्हणून सरकारने वेळीच सावध व्हावे !

गोमंतकीयांच्या रक्षणासाठी कट्टरपंथी आणि घुसखोरांवर त्वरित कारवाई करावी

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल या सामान्य हिंदूची त्याच्या टेलरिंगच्या दुकानात घुसून दोन कट्टरतावादी जिहाद्यांनी नृशंस हत्या केली. त्यानंतर या दोघा जिहाद्यांनी स्वत:चा व्हिडिओ बनवून हसत हसत हत्येची कबुली तर दिलीच; मात्र ती देतांना त्यांनी देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी तसेच नुपूर शर्मा यांनाही धमकीही दिली. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील अमरावती येथेही एका मेडिकल दुकानाचे मालक उमेश कोल्हे यांचीही काही कट्टरतावादी जिहाद्यांनी हत्या केली. या साधारण घटना नसून देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यांवर केलेले आक्रमणच आहे. त्यामुळे हिंदु रक्षा महाआघाडी या घटनांचा तीव्र निषेध करते. पूर्वी सीरिया, अफगाणिस्तान येथे इस्लामिक स्टेटकडून केल्या जाणार्‍या अशा क्रूर जिहादी घटना आता भारतातही चालू झाल्या आहेत. या स्थितीत सध्या गोव्यातही कट्टरपंथी संघटनांचा प्रभाव वाढू लागला आहे. प्रत्येक वर्षी ६ डिसेंबरच्या काळात गोव्यात ‘बाबरी मशिदी’चे पोस्टर्स लावून भावना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही इंडियन मुजाहिदीनचा प्रमुख यासीन भटकळ गोव्यात १ वर्ष राहून गेला होता, तसेच मुंबई आतंकवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याने गोव्यात येऊन दोन गावांतील ज्यू पंथियांच्या छाबड हाऊसची रेकी केली होती. विदेशी पर्यटकांमुळे गोव्याला सातत्याने आतंकवाद्यांनी लक्ष्य बनवण्याची शक्यता वर्तवली जाते. आज गोव्यात रोजगारासाठी येणार्‍यांत अवैध बांगलादेशींचा तसेच रोहिंग्यांचाही समावेश असू शकतो. यांतूनच कट्टरपंथीयांचाही प्रवेश गोव्यात होऊ शकतो. आज उदयपूरच्या कन्हैयालालची हत्या करणार्‍यांचा पाकिस्तानी दावते इस्लामी या संघटनेशी संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशाच प्रकारे गोव्यातही या कट्टरतावादी मानसिकतेचा प्रभाव झालेला असू शकतो. तरी गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये म्हणून आजच गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे, असे वक्तव्य हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक श्री. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
उदयपूर आणि अमरावती येथील दोन्ही घटनांमध्ये केवळ हत्या करणार्‍या जिहाद्यांना अटक केली, म्हणून हा विषय संपला असे होत नाही; कारण नुपूर शर्मा यांच्या विषयावर अनेक चिथावणी देणारी वक्तव्ये देशभरात झाली आहेत. मुसलमान युवकांची माथी भडकवून त्यांचा ब्रेनवॉश करणारे मौलवी तथा कट्टरतावादी मुसलमान संघटना याही तितक्याच दोषी आहेत. ‘आतंकवादाची सुरूवात मदरशांच्या मानसिकतेतून सुरू होते’, असे केरळचे मा. राज्यपाल मोहम्मद आरिफ यांनीही म्हटले आहे. या दृष्टीने आम्ही गोवा सरकारकडे मागणी करतो की, केंद्रातील सरकारद्वारे हिंदूंच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा लावावा. हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्र्य आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. यांसह सरकारने मदरशांना निधी देणे बंद करावे, तसेच आतंकवादाचे प्रशिक्षण देणारे मदरसे त्वरित बंद करावेत. गोव्यातही सरकारने अशा अवैध घुसखोरांची तसेच कट्टरपंथी संशयितांची माहिती देण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात एका विभागाची स्थापना करावी, अशी मागणी हिंदु रक्षा महाआघाडीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली. या पत्रकार परिषदेला हिंदु रक्षा महाआघाडीचे सहनिमंत्रक श्री. संदीप पाळणी, गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, राष्ट्रीय बजरंग दल चे गोवा अध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई, श्री. सुरेश डिचोलकर, श्री. श्रीगणेश गावडे, आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar