हिंदु जनजागृती समितीची हिंदु-राष्ट्र संघटन बैठक
जुने गोवे येथील ‘हात कातरो खांबा’च्या संवर्धनासाठी समिती स्थापन
पणजी, ३ जुलै – पोर्तुगिजांनी धर्मांतराला विरोध करणार्या गोमंतकियांचा ‘इन्क्विझिशन’च्या माध्यमातून जुने गोवे येथील ‘हात कातरो खांब’ येथे अनन्वित छळ केला. ‘हात कातरो खांब’ या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यासाठी हात कातरो खांब संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. हिंदु जनजागृती समितीने पणजी येथील हॉटेल डेल्मॉन येथे आयोजित केलेल्या हिंदु-राष्ट्र संघटन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. बैठकीला राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख श्री. नितीन फळदेसाई, स्वराज्य संघटनेचे श्री. प्रशांत वाळके, शिवयोद्धा संघटनेचे अध्यक्ष श्री. शिवप्रसाद जोशी, पदाधिकारी श्री. माधव विर्डीकर, श्री. दत्तराज केरकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, हिंदु रक्षा महाआघाडीचे प्रा. संदीप पाळणी, केसरिया हिंदु वाहिनीचे राजीव झा, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता तन्मय गावस, निवृत्त सैन्य अधिकारी श्री. प्रवीण चंद्रा, श्री. बी.एस्. नेगी, श्री. शिवणारायन शुक्ला, श्री. स्वागत गावस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. गोविंद चोडणकर आदींची उपस्थिती होती.
बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘हात कातरो खांबा’चे ऐतिहासिक महत्त्व विशद् करून त्याचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ‘हात कातरो खांबा’च्या संरक्षणासाठी हिंदु जनजागृती समितीने आतापर्यंत केलेले प्रयत्न अन् शासनाकडे केलेला पत्रव्यवहार यांविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे श्री. रमेश शिंदे यांनी ‘हात कातरो खांबा’च्या संरक्षणासाठी पुढील दिशा कशी असावी ? याविषयी मार्गदर्शन केले.
‘गोमंतक स्वराज्य’ संघटनेचे श्री. प्रशांत वाळके यांनी ‘हात कातरो खांबा’च्या संवधर्नाच्या दृष्टीने, तसेच ते एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनावे यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याचे दायित्व ‘हात कातरो संवर्धन समिती’चे रहाणार असल्याचे म्हटले. उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी ‘हात कातरो खांबा’च्या संवर्धनासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचे ठरवले.
हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या हिंदु-राष्ट्र संघटन बैठकीच्या प्रारंभी आदर्श गणेशात्सव साजरा करण्याच्या दृष्टीने श्री गणेशमूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचे पदाधिकारी यांच्यासमवेत विचारविनिमय करण्यात आला. आदर्श गणेशोत्सव मंडळाची आचारसंहिता कशी असावी ? गणेशोत्सवाच्या ठिकाणी काय असावे आणि काय नसावे ? श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी ? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राष्ट्र-धर्म जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे, विसर्जन मिरवणूक आदर्श कशी असावी ? यांविषयी विचारविनिमय करण्यात आला. या वेळी कालापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी श्री. विष्णु साळकर यांनी आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी काही बहुमूल्य सूचना केल्या. बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला, तर बैठकीचे सूत्रसंचालन श्री. गोविंद चोडणकर यांनी केले.