पृथ्वीच्या ६०% भागात असलेली वने आता फक्त ३०% भागातच राहिलेली आहेत

.

म्हापसा ः पृथ्वीच्या ६०% भागात असलेली वने आता फक्त ३०% भागातच राहिलेली आहेत. अशी वने कमी झाली, तर निसर्गाचा तोल ढासळत जाईल, पाऊस वेळेवर पडणार नाही, तापमान वाढत जाईल; म्हणून वनांच्या वाढीची, त्यांच्या संरक्षणाची आणि संवर्धनाची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन श्री राम विद्या मंदिर शाळेच्या व्यवस्थापक माधवी हळर्णकर याने केले.

यावेळी प्राथमिक विद्यालयाचे प्रभारी प्रमुख सुजाता पास्ते, शिक्षिका अंकिता पालेकर , शिक्षिका स्नेहा हळर्णकर, प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व इतर उपस्थित होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी जैनविविधता, दुर्मिळ अशा वनसंसदेचे रक्षण व त्याचे संवर्धन याबाबत संस्कारक्षम व यात जाणीव आणि आवड निर्माण व्हावी यासाठी वन महोत्सवाच्या कालावधीत शाळेमध्ये वृक्षारोपण योजना केली.

व्यवस्थापक माधवी हळर्णकर यांच्या मार्गदशानाखाली वन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शिक्षिका अंकिता पालेकर यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar