इन्क्विझिशन काळातील गोमंतकीयांच्या छळाचा साक्षी असणार्‍या प्राचीन स्तंभाच्या संरक्षणासाठी ‘हात कातरो खांब संवर्धन समिती’ गठित !* पणजी, ३ जुलै – गोव्यावर

.

 

 

*इन्क्विझिशन काळातील गोमंतकीयांच्या छळाचा साक्षी असणार्‍या प्राचीन स्तंभाच्या संरक्षणासाठी ‘हात कातरो खांब संवर्धन समिती’ गठित !*

पणजी, ३ जुलै – गोव्यावर पोर्तुगिजांनी लादलेल्या इन्क्विझिशनच्या छळात निरपराध हिंदूंना, तसेच नवख्रिस्तींना शिक्षा देण्यासाठी वापरलेला ‘हात कातरो खांब’ आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. गोमंतकीय जनतेच्या पूर्वजांनी इन्क्विझिशनच्या काळात भोगलेल्या छळाचा एकमात्र पुरावा असणार्‍या जुने गोवा येथील ‘हात कातरो खांबा’कडे पुरातत्त्व विभागाकडून पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. इतकेच काय तर, गोव्याच्या पुरातत्त्व विभागातील काही नतद्रष्ट या खांबाचा इतिहासच नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी, तसेच ‘हात कातरो खांबा’च्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी पणजी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ‘हात कातरो खांबा’चे जतन, संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यीकरण या उद्देशांनी कार्य करण्यासाठी ‘हात कातरो खांब संवर्धन समिती’ची घोषणा करण्यात आली. या बैठकीला गोव्यातील विविध भागांतून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, तसेच इतिहासप्रेमी उपस्थित होते.
या बैठकीत प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी ‘हात कातरो खांबा’चे ऐतिहासिक महत्त्व सांगितले. आज 16व्या शतकातील जुने गोवा चर्चच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभाग करोडो रुपये खर्च करत आहे; मात्र त्यापूर्वीच्या, 13 व्या शतकातील ‘हात कातरो खांबा’कडे मात्र तोच विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 1547 साली पोर्तुगिजांनी श्री सप्तकोटेश्वर देवस्थानचा विध्वंस केला व त्या देवस्थानचा एक खांब तत्कालीन इन्क्विझिशनचे न्यायालय असणार्‍या जुने गोवा येथे आणला. जे हिंदू धर्मांतराला विरोध करत असत, किंवा जे नवख्रिस्ती आपल्या जुन्या हिंदू परंपरांचे आचरण करत असत, त्यांना प्रताडित करण्यासाठी, त्यांचा शारीरिक छळ करण्यासाठी या खांबाचा वापर केला जाऊ लागला. आज या खांबाच्या शेजारी ‘नवा खांब’ म्हणून एक दगड लावून त्याचा नवा इतिहास निर्माण करण्याचा आणि जुने इन्क्विझिशनचे अत्याचार दडपण्याचा प्रयत्न चालू आहे. हा खांब गोव्यातील नागरिकांच्या पूर्वजांच्या स्मृतीशी जोडलेला असल्याने त्याचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत श्री. रमेश शिंदे यांनी मांडले.
दुसर्‍या विश्वयुद्धाच्या वेळी हिटलरने ज्यूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांची माहिती जगाला होण्यासाठी व्हावी म्हणून प्रत्यक्ष जर्मनीमध्ये ‘ऑशविच’ या छळछावणीला संग्रहालय बनवले जाते; मात्र भारतातील गोव्यात इन्क्विझिशनच्या स्मृतींशी निगडीत एकमेव स्मारकाचे संरक्षणही केले जात नाही. यामुळे गोव्यातील हिंदूंनी पुढाकार घेऊन ‘हात कातरो खांब संवर्धन समिती’च्या माध्यमातून कार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.
या वेळी गोव्यातील विविध हिंदुत्वनिष्ठांनी आपले मनोगत व्यक्त करून या विषयाला पाठिंबा घोषित केला. त्यात ‘स्वराज्य संघटने’चे श्री. प्रशांत वाळके यांनी हात कातरो खांबाचे संवर्धन करतांना त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त करून देण्याचे व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनवण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सर्वश्री प्रवीण चंद्रा, माधव विर्डीकर, जयेश थळी, शिवप्रसाद जोशी, राजीव झा, प्रा. नितीन फळदेसाई, प्रा. संदीप पाळणी, अधिवक्ता तन्मय गावस आदी मान्यवरांनी यांनी करून ‘हात कातरो खांब संवर्धन समिती’च्या माध्यमातून पुढील कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. यापुढील बैठकीत ‘हात कातरो खांबा’च्या संवर्धनाच्या संदर्भात पुढील दिशा निश्चित करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar