म्हापसा येथील श्री देव बोडगेस्वर देवस्थान च्या प्रांगणात तुषार प्रकाशन तफै विचार वैभव च्या आठवा अंकाचे प्रकाशन बोडगेस्वर देवस्थान चे अध्यक्ष आनंद भाईडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर देवस्थान चे उपाध्यक्ष श्री. शिदे. मोरजी चे माजी सरपंच धनंजय शेटगावकर, चोपडे आगरवाडेचे माजी सरपंच प्रभाकर नागवेकर, कवी संजय जोशी, पत्रकार नारायण राठवड विचार वैभव चे संपादक तुकाराम शेटगावकर, उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे नारायण राठवड यांनी सांगितले की मराठी भाषेच्या चळवळीत तुकाराम शेटगावकर आपल योगदान देत आहे आणि म्हणून त्रैमासिक अंकाचे प्रकाशन करून विविध लेखकाना आपल्या अंकात साहित्यिकांना प्रेरित करतात, त्याच्या धाडसी प्रयत्नाचे कौतुक करतो, त्याचा हा सातत्याने येत रहावा अशी मी विनंती करतो. अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंद भाईडकर सांगितले की विचार वैभव चे प्रकाशन करताना मला आनंद होतो, मी संपादक तुकाराम शेटगावकर याना शुभेच्छा देतो, शेटगावकर यांनी अंक छापून आम्हा वाचकांवर उपकार केले आहेत, आम्ही नेहमी साहित्यिक चा आदर करतो. लेखक खूप चिंतन करून जे काही लिहीतात ते वाचकांना उपयोगी होत आहे. अंकाचे प्रकाशन देवस्थान च्या प्रांगणात होत आहे याच आम्हाला समाधान होत आहे लेखकांना आशिवाद देऊन
मी त्यांना धन्यवाद देतो यावेळी नारायण खोजुवैकर यांनी आपलै मनोगत व्यक्त केले. तुकाराम शेटगावकर यांनी स्वागत केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत बेतकेकर यांनी केले